नागपूर : गुगलने २०२१मध्ये सर्वाधिक शोधल्या गेलेल्या विषयांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार करोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ‘घरच्या घरी ऑक्सिजन कसा बनवायचा’ या विषयाचा सर्वाधिक नागरिकांनी गुगलवर शोध घेतला असल्याचे दिसून आले आहे. (आज भारतात गुगल टॉप सर्च)

करोना, क्रिप्टोकरन्सी आणि परीक्षांचे निकाल या तीन गोष्टींनी २०२१ हे वर्ष सर्वाधिक चर्चेत राहिले. गुगलने जाहीर केलेल्या माहितीनुसार, या तीन विषयांशी संबंधित माहितीचा शोध गूगलवर सर्वाधिक नागरिकांनी घेतला. दरवर्षी, गुगल विविध श्रेणींमध्ये वर्षातील टॉप सर्च केलेल्या ट्रेंडची यादी प्रसिद्ध करते. त्यात बातम्या, क्रीडा, मनोरंजन आणि इतर श्रेणींमध्ये भारतीयांनी वर्षभरात सर्वाधिक काय शोधले याचा समावेश असतो. यावर्षी मुख्यतः करोना विषाणू आणि भारतात लसीसाठी नोंदणी कशी करावी, या विषयांवर भर होता.

‘कोव्हिड लसीसाठी नोंदणी कशी करावी’ हा शोधयादीतील सर्वात वरचा विषय होता. भारताने लसीकरण अभियान सुरू केल्यानंतर या लसीकरणासाठी नोंदणी कशी करावी, याबाबत सर्वाधिक माहिती घेण्यात आल्याची माहितीही यामुळे पुढे आली आहे. ‘लसीकरण प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे’ हा दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक शोधला गेलेला विषय होता. यासह, क्रिप्टोकरन्सीशी संबंधित ‘भारतात डॉजकॉइन कसे खरेदी करावे’ आणि ‘बिटकॉइनमध्ये गुंतवणूक कशी करावी’ याबाबत भारतीयांनी सर्वाधिक माहिती जाणून घेतल्याचेही या ‘सर्च’नुसार सिद्ध झाले आहे. (google top searches today in India)

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या ठिकाणी खोदकामात असं काही सापडलं की, पोलीस चक्रावले!
असे आहेत काही विषय

– करोना लसीकरिता नोंदणी कशी करावी (How to register for corona vaccine)

– लसीकरण प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे (How to download Vaccination Certificate)

– ऑक्सिजन पातळी कशी वाढवावी (How to increase oxygen level)

– आधार-पॅन लिंक कसे करावे (how to link Aadhar to pan)

– घरी ऑक्सिजन कसा बनवायचा (How to make oxygen at home)

महिला पोलिसांच्या ड्युटीसंदर्भात मोठा निर्णय, पोलीस आयुक्तांनी काढले आदेश
– भारतात डॉजकॉइन कसे खरेदी करावे (How to buy Dodge coin in India)

– केळी ब्रेड कसा बनवायचा

– आयपीओ वाटपाची स्थिती कशी तपासायची (How to check the status of IPO allotment)

– बिटकॉइनमध्ये गुंतवणूक कशी करावी (How to invest in Bitcoin)

– गुणांची टक्केवारी कशी काढायची (How to calculate the percentage of points)

ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे पालिकेचा मोठा निर्णय, आता विनामास्क गाडी चालवली तर…
(गुगल टॉप सर्च आज भारतात)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here