अकोला: अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्या आरोपानंतर धर्म – जातीय वादात अडकलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर सम वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांचे पथक अकोल्यात येऊन गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पथकाने तहसील कार्यालयातून माहिती प्राप्त केली आहे. समीर वानखेडे यांच्या वडिलांच्या नावासमोर अनुसूचित जातीचा उल्लेख असल्याचीही माहिती आहे.

ऑक्टोबरमध्ये क्रूझ प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्राचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री तथा राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मलिकांनी वानखेडेंवर बनावट जात प्रमाणपत्र सादरकरून नोकरी मिळवल्याचे आरोप केले. अनुसूचित जातीला असलेल्या सुविधांचा ड्रग्ज – ऑन गैरफायदा घेत आहेत. असेही मलिक यांचे म्हणणे होते. भारतीय महसूल सेवा ( आयआरएस ) अधिकारी समीर वानखेडे हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये ( एनसीबी ) प्रतिनियुक्तीवर आहेत.

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या ठिकाणी खोदकामात असं काही सापडलं की, पोलीस चक्रावले!
वानखेडे कुटुंब वाशीम जिल्ह्यातील रिसोडचे

वानखेडे कुटुंब मूळचे वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील आहे. २६ जानेवारी १९९८ पर्यंत अकोला व वाशीम जिल्हा संयुक्त होता. स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आलेल्या वाशीम जिल्ह्यात नंतर रिसोडचाही समावेश करण्यात आला. त्यामुळे १९९८ पूर्वीच्या वाशीम जिल्ह्यातील नागरिकांच्या काही नोंदी आजही अकोल्यात आढळून येतात. त्यामुळे पोलिसांचे पथक अकोल्यात कागदपत्रांची पाहणी करण्यासाठी आल्याची माहिती आहे.

समीर वानखडेच्या नावासमोर अनुसूचित जातीचा उल्लेख

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावर नवाब मलिक यांनी आरोप केले होते. वानखेडेंवर आरोप झाल्यानंतर राज्य शासनाकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीसाठी मुंबई पोलिसांचे एक पथक अकोल्यात आले होते. यात एक पोलीस अधिकारी आणि एक कॉन्स्टेबल अशी दोघे जण अकोल्यात आले होते आणि दोन दिवस या पथकाने तहसीलमधून काही माहिती संकलित केल्याची माहिती आहे.

गुगलवर सर्वाधिक शोधले गेले ‘घरी ऑक्सिजन बनविण्याचे तंत्र’, गुगलने जाहीर केली यादी
समीर वानखडेंचे वडिल ज्ञानदेव यांची माहिती तहसील कार्यालयातील दस्तऐवजांमध्ये आहे. सन १९९५ मध्ये नोंदवण्यात आलेल्या माहितीनुसार, ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावासमोर अनुसूचित जातीचा उल्लेख असल्याचे समजते. ही नोंद असलेल्या रजिस्टरची प्रत पथकाने घेतली असून प्रत तहसील कार्यालयाने प्रमाणित करून दिल्याचीही माहिती आहे. पण या विषयी अधिकाऱ्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास टाळले.

ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे पालिकेचा मोठा निर्णय, आता विनामास्क गाडी चालवली तर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here