औरंगाबाद : वीज चोरी रोखण्याचं एक मोठं आव्हान महावितरण समोर आहे. वीज चोरट्यांना रोखण्यासाठी महावितरण अनेक प्रयत्न करते. पण वीज चोरी करणारे नेहमीच महावितरणाच्या एक पाऊल पुढे असतात. आता असाच काही प्रकार औरंगाबादच्या नारेगाव परीसरात पाहायला मिळाला. एका कारखान्यात चक्क एका छोट्या टाचणीचा वापर करून तीन लाख रुपयांची वीज चोरी करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

नारेगाव भागात अनेक कारखाने आहेत. याच भागात असलेल्या सिसोदिया इंडस्ट्रियल ईस्टेटमधील हिलाबी इंजीनियरिंग वर्क्समध्ये प्लास्टिक बॉटल तयार करण्यात येतात. दरम्यान, महावितरणाच्या चिकलठाणा एमआयडीसी शाखेचे अधिकारी सतीश दिवे हे वीज बील वसुलीसाठी कारखान्यात गेले होते. मात्र, याचवेळी त्यांची नजर कारखान्यातील वीज मीटरवर गेली, ज्याचा डिस्प्ले बंद होता. कारखान्यात वीज सुरू आतांना डिस्प्ले कसा बंद आहे, हे पाहण्यासाठी दिवे मीटर जवळ जाताच त्यांना धक्काच बसला.

समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राचं अकोला कनेक्शन समोर, मुंबई पोलिसांनी केला मोठा खुलासा
कारण मीटरचा स्क्रोल बटण एका छोट्या टाचणीने दाबून ठेवून ठेवण्यात आला होता. त्यामुळे जोपर्यंत स्क्रोल बटण दबलेलेअसेल तोपर्यंत डिस्प्ले गायब होते आणि वीज वापराची मीटरमध्ये नोंद होत नाही. वीज चोरीची ही भन्नाट आयडिया पाहून महावितरणचे अधिकारी सुद्धा चक्रावले होते. त्यामुळे मीटर अधिक तपासणीसाठी महावितरणच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आला, ज्यात मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी झाल्याचं स्पष्ट झाले. याप्रकरणी मंगळवारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या ठिकाणी खोदकामात असं काही सापडलं की, पोलीस चक्रावले!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here