उस्मानाबाद : ओमिक्रॉनने उस्मानाबाद जिल्ह्यात फैलाव करायला सुरुवात केली असून यापूर्वी बावी येथील २ रुग्ण ओमिक्रॉन पाँझेटिव्ह आढळले होते. पुर्वीच्या रुग्णांच्या संपर्कातील १३ वर्षीय मुलीचा अहवाल ओमिक्रॉन पॉझेटिव्ह आला आहे. मुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात परदेशातून प्रवास करुन आलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करुन त्याची वैद्यकिय चाचणी केली जात आहेत. ओमिक्रॉनमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा अॅक्टिव्ह झाली असून त्यात उस्मानाबाद जिल्ह्यात ओमिक्रॉनचे २ रुग्ण आढळल्याने चिंता वाढली होती. आता तिसरा रुग्णही पॉझेटिव्ह आढळल्याने चिंता आणखी वाढली आहे.

वीज चोरीची अशी आयडीया पाहिली नसेल! एका टाचणीने ३ लाखांची लाईट चोरली, महावितरणही चक्रावलं
उस्मानाबाद जिल्ह्यातील बावी येथील ४२ वर्षीय रुग्ण शारजा दुबई येथून तो भारतात आल्यानंतर त्याची विमानतळावर तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याची चाचणी निगेटिव्ह आली. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यात आल्यानंतर त्याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. स्थानिक प्रशासनाने याची दखल घेत स्वॅबचे ५ नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवले होते.

ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे पालिकेचा मोठा निर्णय, आता विनामास्क गाडी चालवली तर…
करोनाची लागण झाल्यानंतर ओमिक्रॉनची लागण झाली आहे का? याची तपासणी होणार होती. यानंतर १६ डिसेंबर रोजी ओमिक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याची दखल घेत तात्काळ बावी गावच्या सीमा प्रशासनाने बंद केल्या असून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. उप विभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी हे आदेश काढले आहेत.

समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राचं अकोला कनेक्शन समोर, मुंबई पोलिसांनी केला मोठा खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here