हिंगोली : काळ बदलला की वेळ बदलते अन् अशीच काहीशी वेळ अविवाहित मुलांच्या बाबतीत बदलली आहे. काही वर्षांपूर्वी वर मुलांच्या शोधात फिरणारे बाप आता वधू मुलींच्या शोधात फिरत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. एकेकाळी ठोसरा खाणाऱ्या मुलींच्या वडिलांना / वधूपित्याना चांगले दिवस आले आहेत.

राज्यात तरुणांच्या विवाहाचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. कर्तबगार व नोकरदारांचेच विवाह योग्य वयात होऊ लागले आहेत. उच्च शिक्षण घेऊन सुखी संसाराची स्वप्ने बाळगून असलेले बेरोजगार तरुण पस्तीशी पार करू लागले, तरीही लग्नाच्या बाजारात त्यांना कोणीही विचारायला तयार नाही. काहीही असो.. वधूपित्याला चांगले दिवस आले आहेत, तर विवाहइच्छुक तरुणांवर ‘हुंडा नको, मामा! फक्त पोरगी द्या मला..’ असे म्हणण्याची वेळ आलेली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून ही परिस्थिती बदलत चालली आहे. रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे बेरोजगार युवकांच्या फौजा वाढत आहेत. जमिनीचे तुकडे कमी कमी होत चालले, नोकरी नाही, त्यामुळे विवाहयोग्य वय होऊनही घरी विवाहासाठी वधूपिता फिरकेना अशी वेळ गावागावातील अनेक तरुणांवर आली आहे.

वीज चोरीची अशी आयडीया पाहिली नसेल! एका टाचणीने ३ लाखांची लाईट चोरली, महावितरणही चक्रावलं

शिक्षणात मुली ठरताहेत अग्रेसर

सध्या मुलींच्या शिक्षणाबाबत पालकांमध्ये जागरूकता आलेली आहे. दहा-पंधरा वर्षांपूर्वी ‘मुलगी हे परक्‍या घरचे धन’ आणि ‘चूल आणि मूल सांभाळण्यासाठी’ अशी मुलीच्या बाबतीत धारणा होती. त्यामुळे तिच्या शिक्षणाकडे गांभीर्याने पाहिले जात नसे. परंतु, काळ बदलला आणि मुलांच्या तुलनेत मुली शिक्षणात अग्रेसर राहू लागल्या. विवाहयोग्य वयात आल्यानंतर मुली ‘आपल्यापेक्षा कमी शिकलेला नवरा नको बाई’ असे हक्काने आईला म्हणू लागल्या आहेत. एवढे परिवर्तन समाजात घडले आहे. त्यामुळे शिक्षकाची पत्नी शिक्षिका, डॉक्‍टरची पत्नी डॉक्‍टर, प्राध्यापकाची पत्नी प्राध्यापिका, परिचारकाची पत्नी परिचारिका असे चित्र आज अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे.

ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे पालिकेचा मोठा निर्णय, आता विनामास्क गाडी चालवली तर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here