मुंबई: लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडेच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाची मराठी सिनेसृष्टीत खूप चर्चा आहे. सिनेमाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांना तो आवडला आहे.
‘मुळशी पॅटर्न’ आणि त्याचा हिंदीत झालेला रिमेक ‘अंतिम’मुळे प्रवीण तरडे यांच्या सिनेमाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. टिझरमध्ये ऐकायला मिळणारे संवाद आणि अॅक्शन सिक्वेन्स लक्षवेधी ठरत आहेत. प्रवीणनं स्वतः कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि अभिनय चौफेर जबाबदारी या सिनेमात पेलली आहे.

अभिनेता गश्मीर महाजनी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वतः प्रवीण तरडे साकारत आहे.
चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाउंडेशन करत असून संदिप रघुनाथराव मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडेचे असणार आहेत.