नवी दिल्लीः करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर विविध पातळ्यांवर मोठे निर्णय घेतले जात आहेत. आता परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही मोठा निर्णय जाहीर केला आहे. करोनामुळे देशातील टोल नाक्यांवरील वसुली बंद करण्यात येत असल्याचं गडकरी यांनी ट्विट करून सांगितलंय.
देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात टोल नाक्यांमुळे काही प्रमाणात विलंब होत आहे. याची दखल नितीन गडकरी यांनी घेतलीय. अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वेळेवर व्हावा यासाठी देशातील सर्व टोल नाक्यांवरील वसुली बंद करण्यात येत असल्याचं गडकरींनी जाहीर केलंय. यामुळे अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात होणार विलंम कमी दूर होईल अशी अपेक्षा गडकरींनी व्यक्क केली.
हा निर्णय तात्पुरता घेण्यात आला आहे. तसंच टोल वसुली बंद झाली असली तरी रस्त्यांचे दुरुस्तीचे काम थांबणार नाही. तसंच टोल नाक्यांवरील सर्व सेवा यादरम्यान सुरू राहतील, असंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times