हायलाइट्स:
- सराईत गुन्हेगाराला दणका
- पोलिसांनी वर्षभरासाठी केलं स्थानबद्ध
- औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध गुन्हे करत सतत त्रास देणाऱ्या आकाश माने याच्यामुळे या परिसरात लोक भीतीच्या सावटाखाली होते. वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागल्याने माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना असून महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश काढल्याने सदर आरोपीची औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी करण्यात आली आहे.
पोलीस अंमलदार सागर कडू यांनी गुन्ह्याचा अभिलेख तपासून महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याबाबत पुणे शहराच्या पोलीस आयुक्तांकडे याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर सदर गुन्हेगारावर कारवाईचा आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काढला आणि त्यानंतर त्याची रवानगी औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह येथे करण्यात आली आहे.