चंद्रपूर लाईव्ह न्युज: न्यायालय परिसरात २ तरुणांनी असं काही केलं की थेट रवानगी कारागृहात… – chandrapur news 2 youths sent to jail for spitting in court premises
चंद्रपूर : सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये अशा पाट्या जागोजागी आपण पाहतो. पण हा नियम कोणीही पाळत नाही. यामुळे दुर्गंधी आणि रोग पसरतात याचंही भान नागरिकांना नसतं. अशाच थुंकण्यामुळे दोघांची थेट कारागृहात रवानगी झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ असून तुम्हीही सार्वजनिक ठिकाणी थुंकत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेच्या पथकाने थुंकणाऱ्यांना ४०० रुपयांचा दंड आकारला. मुख्य न्याय दंडाधिकारी एस. एम. काळे यांनी थुंकणार्या नागरिकांना दोन तासांसाठी कोठडीत ठेवण्याची शिक्षा सुनावली. या कारवाईने आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्या नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. Breaking : एसटी कर्मचाऱ्यांचा संयम अखेर सुटला, औरंगाबादमध्ये ७ आगारात मोठा निर्णय सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. असे असतानाही अनेक जण सार्वजनिक ठिकाणी थुंकतात. अशांवर निर्बंध घालण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या लोकांच्या सवयीला आळा घालण्यासाठी आणि मास्कची सवय लावण्यासाठी आता चंद्रपूर महानगरपालिका कठोर कारवाई करीत आहे.
सार्वजनिक ठिकाणी थूंकणाऱ्यांना कायदेशीर तरतुदीनुसार २०० रूपयाऐवजी १२०० रूपयाचा दंड आकारण्याचा सूचना न्यायालयाने ७ एप्रिल २०२१ ला दिल्या. मदत व पुनर्वसन विभागाचा आदेशान्वे थूंकणे व विनामास्क याबाबत कठोर दंड करण्यात येणार आहे.