जालना न्यूज लाईव्ह: धक्कादायक! दुचाकीची समोरासमोर भीषण धडक, भाजप सरचिटणीसचा जागीच मृत्यू – jalna news two wheeler accident bjp official dies on the spot
जालना : राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. अशात भाजपला एक धक्का बसला आहे. दुचाकी समोरासमोर भिडल्याने झालेल्या अपघातात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.
काल औरंगाबाद रोडवरील हॉटेल निवांतसमोर दोन दुचाकी वाहनांचा समोरासमोर अपघात झाला होता. त्यात भाजपचे जालना तालुका सरचिटणीस संतोष ढगे यांचा मृत्यू झाला आहे. संतोष ढगे वय ४५ वर्षे हे त्यांच्या स्कुटीवरून भोकरदन नाक्यावरून काल दुपारी १२ वाजेच्या सुमारास जालना औरंगाबाद रोडने शहराबाहेरील औरंगाबाद चौफुलीकडे असताना त्यांच्या स्कुटीला हॉटेल निवांत परिसरात समोरून येणाऱ्या दुचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. Breaking : एसटी कर्मचाऱ्यांचा संयम अखेर सुटला, औरंगाबादमध्ये ७ आगारात मोठा निर्णय या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झाल्याने संतोष ढगे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह जिल्हा सहकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला. या प्रकरणी कदीम जालना पोलिसांनी बदनापूर तालुक्यातील खामगाव येथील दुचाकीचालक युवक ताब्यात घेतला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.