हायलाइट्स:

  • आदित्य ठाकरेंना मेसेजद्वारे धमकी
  • आदित्य ठाकरेंची नितेश राणेंनी उडवली खिल्ली
  • आदित्य ठाकरे यांना धमकी कोणत्या आवाजात आली- नितेश राणे
  • विधानसभेत येताच आदित्य ठाकरेंसमोर नितेश राणेंकडून म्याऊ म्याऊचा आवाज

मुंबई: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवनात येताच, आमदार नितेश राणे यांनी म्याऊ म्याऊच्या घोषणा दिल्या. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्ष भाजप नेते सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. त्यावेळी हा प्रकार घडला.

राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस म्हणजेच बुधवार विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील ‘संघर्षामुळे’ गाजला. आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्ष भाजप आक्रमक दिसला. विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विरोधी पक्ष भाजपचे सदस्य आक्रमक झालेले पाहायला मिळाले. भाजपच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात निदर्शने केली. तसेच जोरदार घोषणाबाजी केली.

हा व्हिडिओ पाहा

आदित्य ठाकरेंना बघताच नितेश राणेंनी दिल्या ‘म्याव म्याव’ अश्या घोषणा

भाजपचे सदस्य घोषणाबाजी करत असतानाच, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानभवनात येत होते. त्याचवेळी आमदार नितेश राणे यांनी म्याऊ म्याऊच्या घोषणा दिल्या. हा प्रकार घडत असताना, भाजपचे इतर नेते घोषणाबाजी करतच होते. तत्पूर्वी, आदित्य ठाकरेंना व्हॉट्सअॅपवर आलेल्या धमकीच्या मुद्द्यावरूनही नितेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. धमकी मिळण्यासारखे आदित्य ठाकरे असे काय करतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. आदित्य ठाकरे यांना कोणत्या आवाजात धमकी आली, असा खोचक प्रश्नही त्यांनी केला. तसेच आदित्य ठाकरे यांनी रात्री सात आणि आठ वाजताच्या नंतरच्या ‘बैठका’ बंद कराव्यात म्हणजे त्यांना धमक्या मिळणार नाहीत, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.

Live: हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, वंचितच्या कार्यकर्त्यांचा विधानभवनावर मोर्चा

सभागृहात अनिल परब आणि नितेश राणे भिडले; बाहेरचा राग आत निघला?

आदित्य ठाकरेंच्या धमकीचा मुद्दा विधानसभेत

आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअॅपद्वारे धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने बेंगळुरूतून आरोपीला अटक केली आहे. सुरुवातीला आरोपीने फोन केला होता. मात्र, आदित्य ठाकरेंनी फोन उचलला नाही. नंतर व्हॉट्सअॅपवर मेसेज करून धमकी देण्यात आली. तसेच त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषाही वापरण्यात आली. दरम्यान, आज विधानसभेच्या सभागृहातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. राज्य स्तरावर एक एसआयटी नेमण्यात येऊन तपास करण्यात येईल, अशीही माहिती त्यांनी दिली.

Nitesh Rane : आमदार नितेश राणेंविरोधात मुंबईत तक्रार, कणकवलीतही पोलिसांनी बजावली नोटीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here