हायलाइट्स:

  • एका युवकासह दोन युवतींची आत्महत्या
  • मणेराजुरीच्या डोंगरात आढळले तिघांचे मृतदेह
  • प्रेम प्रकरणातून घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज

सांगली : सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी गावाशेजारी शेख फरद्दीन बाबा (शेकोबा) डोंगरावर एका तरुणासह दोन तरुणींचे मृतदेह गुरुवारी सकाळी आढळले. या तिघांनीही प्रेम प्रकरणातून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या (आत्महत्या प्रकरण) केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहांजवळ कीटकनाशकासह चॉकलेट्स, पुष्पगुच्छ आणि हार सापडले आहेत. (प्रेम प्रकरण बातम्या)

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव हरीश हणमंत जमदाडे (वय २१ रा, मणेराजुरी ) असं असून, मृत दोन्ही तरुणींची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. एकाच वेळी तिघांनी केलेल्या आत्महत्येमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

करुणा मुंडेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा; पहिल्याच दिवशी केला धक्कादायक खुलासा

तासगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मणेराजुरी गावाजवळ असलेल्या शेकोबाच्या डोंगरावर एका तरुणासह दोन तरुणींनी आत्महत्या केल्याची माहिती गुरुवारी सकाळी मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. डोंगरावर निर्जन स्थळी तीन मृतदेह आढळले. मृतदेहांच्या शेजारी द्राक्ष बागांसाठी वापरले जाणारे कीटकनाशक पडले होते. तसंच चॉकलेट्स, हार आणि पुष्पगुच्छही मिळाले.

explosion in ludhiana : पंजाब हादरले​… ​लुधियानातील कोर्टात स्फोट, १ ठार; मुख्यमंत्री चन्नी म्हणाले…​

या तिघांनीही रात्री विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव हरीश हणमंत जमदाडे असं आहे, तर मृत तरुणीची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, प्रेमप्रकरणातून हा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तरीही सर्व कारणांचा शोध घेतला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here