अमरावती : मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले असून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ यामध्ये बदल करण्यात येत असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. याचा निषेध म्हणून अमरावती विद्यापिठावर छात्र आक्रोश मोर्चा काढला. सोबतच कुलगुरू यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन विद्यार्थ्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी उपस्थित पोलिसांकडून आंदोलकांना डिटेन करण्यात आले. दरम्यान मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय तात्काळ रद्द करावा, या मागणीचे निवेदन विद्यापीठ कुलसचिव यांना देण्यात आले.

राज्य शासनाने मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही निर्णय घेतले आहे. १५ डिसेंबरला झालेल्या या बैठकीत विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर घाला घालत आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ या कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय प्रस्तावित असून अधिवेशनात या निर्णयाचे रूपांतर कायद्यात करण्याचा मानस राज्य शासनाचा असल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे म्हणणे आहे.

Breaking : एसटी कर्मचाऱ्यांचा संयम अखेर सुटला, औरंगाबादमध्ये ७ आगारात मोठा निर्णय
या निर्णयात राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठाचे कुलपती असणारे राज्यपाल हे कुलगुरूंनी थेट नियुक्ती करू शकणार नाही. सोबतच शासनाने सुचविलेल्या दोन नावांमधून राज्यपाल कुलपतींची नियुक्ती करू शकतो. तसेच विद्यापीठात कुलपती पदावर प्र- कुलपती म्हणून एक नवीन पद निर्माण करण्यात येणार असून त्या पदी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे एबीव्हीपीने निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे विद्यापीठांवर राजकीय हस्तक्षेप वाढणार असल्याचे एबीव्हीपीचे म्हणणे आहे.

याचा परिणाम हा विद्यार्थी, प्राध्यापकांवर पडणार आहे. त्यामुळे हा निर्णय तात्काळ रद्द करावा, तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नियमित मिळावी, या मागणीसाठी एबीव्हीपी च्या नेतृत्वात आक्रोश आंदोलन करण्यात आले. सोबतच या निर्णयाचा निषेध व्यक्त करीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून राज्य शासनाविरोधात घोषणाही देण्यात आल्या.

वीज चोरीची अशी आयडीया पाहिली नसेल! एका टाचणीने ३ लाखांची लाईट चोरली, महावितरणही चक्रावलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here