अहमदाबादः गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका करोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झालाय. अलिकडेच विदेशात जाऊन आलेल्या एका ८५ वर्षीय महिलेचा करोनाने बळी घेतलाय. त्यांना अहमदाबादच्या जिल्हा रुग्णालयात २२ मार्चला दाखल करण्यात आलं होतं. करोनाची लागण होण्यापूर्वी या महिलेला आधीपासून बरेच आजार होते, अशी माहिती गुजरातच्या आरोग्य विभागाने दिलीय. करोनाने गुजरातमध्ये घेतलेला हा दुसरा बळी आहे. यासह करोनामुळे देशातील बळींची संख्या १२वर पोहोचली आहे. याआधी मध्य प्रदेश आणि तामिळनाडूत प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झालाय.

गुजरातमध्ये करोनाचे ३९ रुग्ण आढळले आहेत. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे देशात बुधवारी करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ६५९वर गेली आहे. यापैकी ४३ जण बरे झाले आहेत. तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

करोना व्हायरसने बुधवारी मध्य प्रदेश आणि तामिळनाडू एक-एक बळी घेतला. दोन्ही राज्यांत करोनामुळे प्रथमच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात इंदूरमध्ये ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही माहिला उज्जैनची आहे. ती अलिकडेच विदेशात परतली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

घरात राहण हाच एकमेव उपाय

करोनाची साखळी तोडायची असेल. त्यावर मात करायची असेल तर घरात राहणं हाच एकमेव पर्याय आहे. सामाजिक भेटी-गाठींपासून दूर राहा. संयम ठेवा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतील नागरिकांशी संवाद साधताना केलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here