हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात आले नाहीत. मुख्यमंत्र्यांची अधिवेशनातील अनुपस्थिती हा मुद्दा विरोधकांनी प्रचंड मोठा केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दर्शन कधी होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.

CM Uddhav Thackeray: विरोधकांचा ‘नामजप’ फळाला; अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसले!
हायलाइट्स:
- हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात आले नाहीत
- मुख्यमंत्र्यांची अधिवेशनातील अनुपस्थिती हा मुद्दा विरोधकांनी प्रचंड मोठा केला होता
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार होते. मात्र, विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर प्रथेप्रमाणे बहिष्कार टाकल्याने उद्धव ठाकरे यांचा घराबाहेर पडण्याचा बेत बारगळला होता. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात आले नाहीत. मुख्यमंत्र्यांची अधिवेशनातील अनुपस्थिती हा मुद्दा विरोधकांनी प्रचंड मोठा केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दर्शन कधी होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अखेर गुरुवारी संध्याकाळी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून का होईना, उद्धव ठाकरे यांचा चेहरा सर्वांना दिसला आहे. त्यामुळे आता ते प्रत्यक्षात सर्वांसमोर कधी येणार, हे पाहावे लागेल.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीचा मुद्दा लावून धरला होता. उद्धव ठाकरे आजारी असल्यामुळे त्यांनी गैरहजर असणे स्वाभाविक आहे. त्यांचे आजारपण हे चिंताजनक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार तुर्तास दुसऱ्या कोणाकडे तरी सांभाळायला द्यावा. त्यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांवर विश्वास नसणे स्वाभाविक आहे. शिवसेनेतील नेत्यांवरही उद्धव ठाकरे यांचा विश्वास नसेल तर त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा कारभार सोपवावा. आता उद्धव ठाकरे यांचा स्वत:च्या मुलावरही विश्वास नाही का, असा खोचक सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता.
Maharashtra Vidhan Sabha: मुख्यमंत्र्यांच्या घराशी माझी जवळीक नाही | चंद्रकांत पाटील
तर आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन टीका केली होती. आमचे मुख्यमंत्री मिस्टर इंडिया आहेत. त्यांनी मिस्टर इंडियाचं घड्याळ बाजूला काढावं आणि आम्हाला कधीतरी दिसावं असं आमचं म्हणणं आहे. अधिवेशनात मुख्यमंत्री नसेल, तर सरकारला आणि विरोधकांना न्याय देणार कोण?, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला होता.
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून