कोल्हापूर : जिल्ह्यात तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. जोशी यांनी आजन्म कारावास आणि २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा झालेला आरोपी हा शाहूवाडी तालुक्यातील असून त्याचे नाव यशवंत नलावडे असं आहे. (कोल्हापूर गुन्हे ताज्या बातम्या अपडेट)

शाहूवाडी तालुक्यातील सावे गावात यशवंत नलवडे हा ५१ वर्षीय व्यक्ती पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडा सोबत राहतो. त्याच्या घरात नातवंडासोबत खेळायला आलेल्या एका मुलीवर त्याने अत्याचार केले होते. तसंच बालिकेच्या हातावर, पाठीवर चावा घेऊन तिला गंभीररित्या जखमी केले. या प्रकरणानंतर पीडित बालिका रक्तबंबाळ अवस्थेत रडत घरी गेली. तिच्या अंगावरील सर्व कपडे रक्ताने माखले होते. पीडितेच्या आईने मुलीकडे चौकशी केली असता मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. २८ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर पीडित मुलीला त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पुण्यात गुन्हेगाराला अटक केल्यानंतर खळबळजनक खुलासा; विमानाने यायचा आणि…

याबाबत शाहूवाडी पोलीसात नलवडे याच्याविरोधात पीडितेच्या आईने तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी नलवडे यास अटक करून त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही.व्ही.जोशी यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे १९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यांच्या साक्षी, भक्कम पुरावे आणि सरकारी वकील मंजूषा पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून शिक्षा सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here