हायलाइट्स:
- ड्रेनेजमध्ये पडून दोघांचा जागीच मृत्यू
- अन्य दोघे गंभीर जखमी
- जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
सोलापूर अक्कलकोट या रस्त्याचं काम सध्या सुरू आहे. या चार पदरी रस्त्यामुळे अगोदरच ड्रेनेजची कामे केली जात आहेत, मात्र हे काम करताना कोणतीही खबरदारी संबंधित ठेकेदाराने अथवा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली नसल्याने सदरची घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. रस्त्याला लागून असल्याने आणि त्यावर कसल्याही प्रकारचं झाकण नसल्याने हे ड्रेनेज धोकादायक अवस्थेत होते. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी या ड्रेनेजमध्ये चार जण पडले.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर आजुबाजूच्या नागरिकांनी ड्रेनेजमध्ये पडलेल्या चार जणांना वाचवण्याचा प्रयत्न केला. शर्थीचे प्रयत्न करून दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. मात्र सध्या त्यांची परिस्थिती गंभीर आहे, तर इतर दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.