औरंगाबाद : जालना औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या हसनाबाद पोलीस ठाणे अंतर्गत शुल्लक कारणावरून एका ३५ वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. अटक असलेल्या आपल्या नातेवाईकांची जामीन घेण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीची चौघांनी गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील देऊळगाव कमानीजवळ गोषेगाव शिवारात २० डिसेंबर रोजी गोरखनाथ नामदेव जिवरग नावाच्या व्यक्तीचा मृतदेह रस्त्यालगत असलेल्या एका खड्ड्यात आढळून आला होता. त्यानंतर माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मृत युवकाच्या अंगावर आणि डोक्यावर मारहाण केल्याचा जखमा होत्या. तसेच शवविच्छेदन अहवालात सुद्धा मारहाण करून गळा आवळल्याचे निष्पन्न झाले होते.

वीजबिल थकलेल्यांसाठी महावितरणाचा मोठा निर्णय, १८ लाख ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी
त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता, मृत व्यक्तीच्या पत्नीने तक्रार देत म्हंटलं आहे की, काही दिवसांपूर्वी लखन भोसले यांच्या नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे या नातेवाईकांची जामिनीसाठी लखन भोसले आणि इतर लोकं माझ्या पतीकडे तगादा लावून होते. पण आपल्या पतीने त्या आरोपींची जामीन घेण्यास नकार दिल्याने लखन आणि त्याच्या साथीदाराने माझ्या पतीचा खून केल्याची तक्रार मृत तरुणाच्या पत्नीने दिली आहे. त्यामुळे याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपुरकरांची चिंता वाढली, ओमायक्रॉनचा दुसरा बाधित आढळला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here