हायलाइट्स:

  • कल्याण-डोंबिवलीच्या लसीकरण केंद्रावर अजब प्रकार
  • करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नोंदणी केली, पण डोस न घेताच काढला पळ
  • पळून जाणाऱ्या तरूणाला कर्मचाऱ्यांनी रोखले, पण…
  • तरूण पळून जातानाचा व्हिडिओ व्हायरल

डोंबिवली: ओमिक्रॉनच्या (ओमिक्रॉन) पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा नियम कठोर करण्यास सुरुवात केली आहे. करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घ्यावे लागत आहेत. यामुळे लसीकरणासाठी गर्दी वाढत आहे, मात्र अनेक जण यातही पळवाट शोधण्याचा प्रयत्न करत असल्याने संभाव्य तिसरी लाट रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. डोंबिवलीत नुकताच एक अजब प्रकार घडला आहे. डोंबिवलीत २९ वर्षीय एका युवकाने लसीकरणासाठी नोंदणी केली आणि लस न घेताच पळून गेल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. तर आरोग्य विभाग या तरुणाचा शोधण्याच्या कामाला लागले आहेत.

डोंबिवली पूर्वेकडे नेहरू मैदानात पालिकेच्या वतीने लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून, गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास या केंद्रावर लस घेण्यासाठी आलेल्या ऋषीकेश मोरे या २९ वर्षीय तरूणाने दुसऱ्या डोससाठी रजिस्ट्रेशन केले. मात्र त्यांनतर तो लस न घेताच निघून जाऊ लागला. सेंटरवरील कमचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी ऋषिकेशला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने स्वच्छतागृहात जाऊन येण्याचा बहाणा केला. त्यावर कर्मचाऱ्यांनी त्याला लस टोचून घेतल्यानंतर जाण्यास सांगितले. मात्र यानंतर तो चक्क पळून जाऊ लागला. यामुळे सेंटरवर असलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ढकलून देत तो लस न घेताच पळून गेला. या घडल्या प्रकाराबाबत कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली. या तरुणाला शोधून काढत त्याचे लसीकरण केले जाणार असल्याचे सांगितले. मात्र दुसरा डोस असतानाही त्याने लस घेण्यास टाळाटाळ केल्याने पहिला डोस देखील त्याने घेतला आहे की, केवळ कागदोपत्री नोंद करून प्रमाणपत्र मिळवले आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

omicron : आली गुड न्यूज … कोविशिल्डचा तिसरा डोस ओमिक्रॉनला फिरकूही देणार नाही!
Uddhav Thackeray: महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध; CM ठाकरेंनी दिले ‘हे’ निर्देश, आजच नव्या गाइडलाइन्स

कल्याण – डोंबिवली महापालिकेकडून लसीकरण सुरू आहे. केंद्रावर तरूण लस घेण्यास आला. त्याने नोंदणी केल्यानंतर तो पळून जाऊ लागला. कर्मचाऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. पण तो तरूण लसीचा डोस न घेता पळून गेला. वरिष्ठांना कळवले आहे. त्या तरूणाला शोधून डोस देण्यात येईल. वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपमा साळवी यांनी सांगितले.

Omicron: सावधान! मुंबईत ४८ तासांमध्ये करोना रुग्णांची संख्या दुप्पट; २४ तासांत ६०२ रुग्णांची नोंद
Omicron Lockdown: महाराष्ट्रात पुन्हा नाईट कर्फ्यू लागणार? अजित पवार यांचे सूचक वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here