हायलाइट्स:
- राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचा विदर्भ आणि मराठवाड्यावर राग आहे
- विदर्भ आणि महाराष्ट्रातील जनता ही नेहमी भाजप किंवा काँग्रेसच्या पारड्यात मत टाकते
- राष्ट्रवादी आणि शिवसेनेने विदर्भ, मराठवाड्याची वाट लावण्याचे ठरवले आहे
यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचा विदर्भ आणि मराठवाड्यावर राग आहे. कारण विदर्भ आणि महाराष्ट्रातील जनता ही नेहमी भाजप किंवा काँग्रेसच्या पारड्यात मत टाकते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेने विदर्भ, मराठवाड्याची वाट लावण्याचे ठरवले आहे, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला. तसेच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत सरकारने आमच्याशी कोणतीही चर्चा केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सरकारने याविषयी विरोधकांशी बोलायला पाहिजे होते. भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द झाल्याशिवाय आम्ही ही निवडणूक होऊ देणार नाही. सरकार याबाबत अधिकृतरित्या आमच्याशी चर्चा करेल तेव्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार उतरवयाचा की नाही, याचा निर्णय भाजपकडून घेतला जाईल. सल्लागार समितीच्या बैठकीत आम्ही हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचीही मागणी केली होती, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
‘विदर्भ-मराठवाडा महाराष्ट्रात येतो का, तुम्ही आपलं मानता का’
महाविकासआघाडी सरकारकडून विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्यायांची मालिका सुरु आहे. विदर्भ-मराठवाड्याचा वापर हा एखाद्या वसाहतीप्रमाणे केला जात आहे. मुळात हे सरकार मराठवाडा आणि विदर्भाला महाराष्ट्राचा भाग मानतात का, हाच प्रश्न असल्याची जळजळीत टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. महाविकासआघाडी सरकारच्या काळात मराठवाडा आणि विदर्भासाठीच्या योजनांना लावण्यात आलेल्या कात्रीवरुन फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.