औरंगाबाद : औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील एका महिलेला आपल्या घरात आलेल्या दिराला पिण्यासाठी पाणी देणं चांगलाच महागात पडलं आहे. कारण दिराला पाणी का दिलं म्हणून पतीने पत्नीला थेट हातातील काठीने मारहाण केली आहे. याप्रकरणी आता वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैजापूर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, २२ डिसेंबर मी घरात असताना माझा दिर हा आमच्या घरी आला. तेव्हा पीडित महिलेने दिराला पिण्यासाठी पाणी दिले. त्यानंतर दिर घरातून निघून गेला. त्यानंतर पीडित महिलेचा पती आला आणि माझा भाऊ अपल्या घरी कशासाठी आला होता अशी विचारणा करू लागला. तसेच त्याच्यासोबत तुझे काहीतरी संबंध आहे असे म्हणत, पीडित महिलेला काठी घेवून मारहाण करायला सुरुवात केली. ऐवढंच नाही तर पोटात लाथा मारून घरातून बाहेर हाकलून दिले, असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. ‘आलिशान बंगले आणि राजकारण’, पेपरफुटी प्रकरणी सुत्रधार प्रितीश देशमुखबद्दल धक्कादायक माहिती उघड पती-पत्नीच्या नात्यात विश्वास असणे खूप महत्वाचे असते. कारण, जेव्हा या नात्यात संशयाच भूत घुसतो तेव्हा कुटुंब उध्वस्त होण्यासाठी काहीच वेळ लागत नाही, असे अनेक घटना आजपर्यंत समोर आल्या आहेत. औरंगाबाद वैजापूर तालुक्यातील ही घटना सुद्धा यामुळेच घडली आहे.
पतीकडून चारित्र्यावर संशय होत असताना पीडित महिला असे काही नसल्याचं समजवून सांगत होती. पण डोक्यात संशयाचा भूत घुसलेला पती आयकायला तयार नव्हता आणि त्याने पत्नीला थेट मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे हतबल झालेल्या पत्नीने थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. यावरून वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.