मुंबईः चित्रपट यांचं निधन झालंय. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. , , , , मेरे मेहबूब, पूजा के फुल, आकाशदीप, लव्ह अँड गॉड या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. निम्मी या काही काळापासून आजारी होत्या. निम्मी यांचे वडील मेरठचे होते. तर निम्मी यांचा जन्म हा आग्रामध्ये झाला होता.

निम्मी यांची आई वहिदन यांनी त्यावेळी चित्रपट क्षेत्रात मोठं नाव कमावलं होतं. चित्रपट उद्योगातील सर्वच दिग्गज निर्मात्यांशी त्यांची ओळख होती. निम्मी यांचे नाव नवाब बानो होते. ते नाव राज कपूर यांनी बदलून निम्मी असे ठेवले. त्यावेळी गाजलेल्या बरसात चित्रपटासाठी अभिनेत्री नरगिस यांचे नाव निश्चित झाले होते. ते निश्चित झाले नसते तर निम्मी यांचा अभिनेत्री म्हणून राज कपूर यांनी विचार केला होता.

बरसात चित्रपट हातून निसटल्यावर निम्मी यांनी आन, उडन खटोला, भाई भाई, कुंदन, मेरे महबूब या सारख्या ट्रेंड सेट करणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केलं. निम्मी या अतिशय साध्या आणि मनमिळावू होत्या, असं निम्मी यांच्या भावाचे जावई आणि चित्रपट निर्माते कलीम खान यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here