२४ तासांत ५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेतली. दिल्लीत अत्यावश्यक सुरू राहतील. अत्यवश्यक सेवांमध्ये असतील त्यांना पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण ज्यांच्याकडे कुठलेही ओळखपत्र नाही त्यांनाच हा पास दिला जाईल. ई-पास मिळवण्यासाठी १०३१ क्रमांकावर संपर्क करा, असं आवाहन केजरीवाल यांनी केलंय.
अत्यावश्य सेवा पुरवण्याची सरकारची जबाबदारी आहे. लॉकडाऊन दरम्यान काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना येण्या-जाण्याची परवानगी आहे. पण खासगी हॉस्पिटल्समध्ये काम करणारे आणि माध्यमांतील प्रतिनिधींना ओळखपत्र दाखवल्यास येण्या-जाण्याची सूट दिली गेली आहे, असं केजरीवाल म्हणाले.
स्थानिक दुकानावर जाण्यासाठी पास गरज नाही
दिल्लीतील नागरिक स्थानिक दुकानांमध्ये घरगुती सामान विकत घेण्यासाठी जातात. यासाठी त्यांना पास घेण्याची गरज नाही. शेजारी असलेल्या दुकात किंवा कॉलनीतील दुकाना जाण्यासाठी नागरिकांना पासची आवश्यकता नाही. नागरिक शेजारच्या किंवा जवळच्या किरना दुकानांमध्ये भाजीपाला आणि दूध घेऊ शकतात, असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.
करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्स आणि डॉक्टरांना घरातून बाहेर काढण्याची धमकी काही घर मालकांनी दिलीय. अशा घर मालकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा अरविंद केजरीवाल यांनी दिलाय. तसंच दुर्दैवाने तुमच्या घरातील कुणाला करोनाचा संसर्ग झाल्यास हे डॉक्टर आणि नर्स तुमच्या मदतीसाठी येतील, असंही केजरीवाल यांनी सुनावलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times