औरंगाबाद : करोनाच्या विषाणूतील ओमायक्रॉनच्या नव्या प्रकाराने जगभरातील प्रमुख देशांमध्ये दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे विदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची व पर्यटकाची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. या आदेशानुसार, महापालिकेतर्फे करोना चाचण्या केल्या जात आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचणीतून ७७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ५६ जणांचा अद्याप शोध लागलेला नसून, १०७ जण पालिकेच्या यंत्रणेला करोना चाचणीसाठी प्रतिसादच देत नसल्याची माहिती हाती आली आहे. (महाराष्ट्रात आज कोरोनाचे रुग्ण परदेशातील 771 लोक निगेटिव्ह)

करोना संसर्गाच्या आतापर्यंतच्या विषाणुंच्या तुलनेत ओमायक्रॉनचा फैलाव अत्यंत गतीने होत असल्यामुळे शासकीय व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची व पर्यटकाची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. या चाचणीसाठी महापालिकेने विशेष यंत्रणा उभारली आहे. परदेशातून आलेल्या व्यक्तींची यादी जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेला प्राप्त होते. या यादीच्या आधारे त्या त्या व्यक्तींशी संपर्क साधला जातो आणि त्यांची करोना चाचणी केली जाते. एक डिसेंबरपासून अशा प्रकारची कार्यपद्धती अवलंबण्यात आली आहे.

BMC Bans New Year Celebration: मुंबईत न्यू ईयर सेलिब्रेशनवर पूर्ण बंदी; जाणून घ्या नेमका आदेश
महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार १ ते २४ डिेसेंबर दरम्यान औरंगाबादमध्ये परदेशातून एक हजार ४० व्यक्ती दाखल झाल्या. त्यापैकी ३१ जण बाहेरगावचे आहेत, वीस जणांची नावे दोनदा नोंदवण्यात आली आहेत. १०४० जणांपैकी ८६६ जणांशी संपर्क झाला असून त्यांच्यापैकी ७७१ जणांचे करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ५६ जणांचा शोध अद्याप लागलेला नाही, तर १०७ जणांनी करोना चाचणीसाठी महापालिकेला प्रतिसाद दिलेला नाही. परदेशातून आलेल्या व्यक्तीमध्ये ३३ लहान मुलांचा समावेश आहे. या मुलांची करोना चाचणी अद्याप करण्यात आलेली नाही. सहा प्रवासी ग्रामीण भागातील आहेत, त्यामुळे पालिकेतर्फे त्यांची चाचणी झालेली नाही.

‘सभु’मधील १०६ विद्यार्थी निगेटिव्ह

सभु शाळेतील ३५२ विद्यार्थ्यांची महापालिकेतर्फे गुरुवारी (२३ डिसेंबर) आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी १०६ विद्यार्थ्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती डॉ. मेघा जोगदंड यांनी दिली. उर्वरित विद्यार्थ्यांचे चाचणी अहवाल येणे बाकी आहे. या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची करोना चाचणी यापूर्वीच करण्यात आली,त्यात एक शिक्षक पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. (corona cases in Maharashtra today 771 people from abroad are negative)

भाकर करून दे म्हणताच, सुनेने सासूच्या हाताची बोटं मोडली; एवढेच नाही तर…
(महाराष्ट्रात आज परदेशातील 771 कोरोनाचे रुग्ण निगेटिव्ह आले आहेत)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here