औरंगाबाद लाईव्ह बातम्या: सख्ख्या बहिणीवर भावाकडून २ वेळा बलात्कार, न्यायालयाने सुनावली ‘कठोर’ शिक्षा – brother sentenced to 10 years hard labor for raping sister
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने सख्या बहिणीवर बलात्कार करणाऱ्या भावाला विवध गुन्ह्याखाली १० वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. तर याच गुन्ह्यात पीडितेच्या आईला एक वर्ष कैद आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
पिशोरच्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या १८ वर्षीय सख्ख्या भावाने आपल्या १४ वर्षांच्या लहान बहिणीवर बलात्कार केला होता. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला मात्र, आईने तिलाच काठीने मारहाण करत कुणालाही घडलेला प्रकार सांगू नको, अन्यथा आपली बदनामी होईल म्हणून तोंड बंद ठेवण्यास सांगितले. यामुळे भावाची हिम्मत वाढली आणि त्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा बहिणीवर अत्याचार केला. संशयाचं भूत! दिराला पाणी दिलं म्हणून पतीला राग, पत्नीसोबत केलं भयंकर कृत्य मुलीला होणाऱ्या वेदनामुळे शेजारील महिलांना विचारपूस करत मुलीला बोलतं केलं आणि थेट पोलीसांना माहिती दिली. त्यानंतर प्रकरण समोर आलं. या प्रकरणी न्यायालयाने निकाल देतांना, कलम चार पोक्सोअंतर्गत दहा वर्षे कैद, दहा हजार दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने केंद, कलम ५(१) पोक्सोमध्ये दहा वर्षे सक्त मजुरी व दहा हजार दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद, ५(एन) मध्ये दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार दंड, दंड भरल्यास सहा महिना कैद, तर आरोपी आईस कलम ३२४ मध्ये एक वर्ष कैद व एक हजार दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद व पोक्सो (एन) पोक्सो मध्ये सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.