औरंगाबाद : नोकरी नसल्यामुळे सध्या लग्न करु शकत नाही. तुझ्या आई-वडिलांनी वीस लाख रुपये हुंडा द्यायला हवा असं म्हणत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहून मौजमजा केल्यानंतर नातेवाईक तरुणाने गुपचूप दुसरीसोबत लग्न आटोपले. या प्रकारामुळे धक्का बसलेल्या उच्चशिक्षीत तरुणीने पोलीस ठाणे गाठत तरुणाविरुध्द फसवणुकीची तक्रार दिली आहे. गोविंद जनार्दन घोडे (रा. खवणे पिंप्री, ता. सेलू, जि. परभणी) असं फसवणुक केलेल्या तरुणाचं नाव आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एम. फिलच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणा-या २५ वर्षीय तरुणीची नातेवाईक असलेल्या गोविंद घोडेसोबत सन २०१६ मध्ये ओळख झाली होती. नातेवाईक असल्यामुळे तरुणीच्या आई, वडिल व मामाने त्याला तरुणीसोबत लग्न करण्याबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने दोघांचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर लग्न करण्याबाबत सांगितले. त्यानंतर सन २०१७ मध्ये तरुणीने विद्यापीठात एम. ए. च्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यामुळे ती विद्यापीठातील वसतीगृहात राहू लागली. दोन्ही कुटुंबियांची लग्नाला संमती असल्यामुळे दोघेही अधुन-मधुन भेटू लागले.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा मोठा दणका; बडतर्फीच्या कारवाईवर दिला निर्णय
मात्र, करोनामुळे मार्च २०२० मध्ये वसतीगृह बंद झाले. म्हणून तरुणी आई व गोविंद घोडे असे तिघेही बेगमपुरा भागातील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहू लागले. तर नोकरी नसल्यामुळे तरुणीच्या कुटुंबियांनी वीस लाख रुपये हुंडा द्यावा, अशी मागणी घोडे याने केली. त्यानंतर त्याचा विवाह झाल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं.

तरुणीच्या कुटुंबाला धक्का…

लग्नाची तारीख २८ मे २०२१ ही ठरली असताना देखील घोडेने बीड येथील एका तरुणीशी गुपचूप विवाह आटोपला. याची माहिती मिळाल्यामुळे तरुणीसह तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्यामुळे कुटुंबियांनी तरुणीसोबत पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्याकडे तक्रार दिली. त्यावरुन बेगमपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी सांगितले.

Christmas News : ख्रिसमससाठी माहेरी परतणाऱ्या महिलेवर काळाचा घाला, मुंबई येथून निघाली अन्…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here