औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक आस्तिक कुमार पांडे सापडत नसल्याने नागरिकांनी थेट विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांच्याकडे धाव घेतली आहे. तर आयुक्त पांडे हे आपल्या मुख्यालयाकडे फिरकत नसून, पालिकेतील कारभारावर कुणाचाच वचक राहिला नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आयुक्त महानगरपालिका कार्यालयात येतच नसून, मुख्यालयाऐवजी पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात बसून कारभार चालवत आहे. तर प्रत्यक्ष कारवाईची कामेही आपल्या शासकीय जलश्री बंगल्यावरून करत असल्याचा आरोप करत, रामसिंग पाटील यांच्यासह दहा नागरिकांनी स्वाक्षरी केलेला निवेदन विभागीय आयुक्तांना दिलं आहे.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा मोठा दणका; बडतर्फीच्या कारवाईवर दिला निर्णय
आयुक्तच कार्यालयात येत नसल्यामुळे इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कोणताही वचक राहिला नाही. त्यामुळे समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांची कुंचबणा होत आहे. गेली महिन्याभरात आयुक्त फक्त तीन-चार दिवस कार्यालयात उपस्थित होते. त्यामुळे अशावेळी नागरिकांनी आपल्या समस्या कुणाकडे मांडाव्यात असा प्रश्न निवेदनकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

नागरिकांची कुंचबणा….

महानगरपालिकेचा कार्यकाळ संपला असल्याने प्रशासक नियुक्ती म्हणून आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांच्या हाती महानगरपालिकेचा सर्व कारभार आहे. नगरसेवक किंवा महापौर यांना आता महापालिकेच्या कामात हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे महापालिका कार्यालयात आयुक्त जर उपलब्ध राहिले तर नागरिकांच्या समस्या मार्गी लागू शकतात, अन्यथा त्यांना कार्यालयाच्या खेट्या माराव्या लागत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहेत.

शिक्षक पतीची बेल्टने पत्नीला मारहाण, काही समजण्याआधीच सासऱ्याने केस पकडले आणि…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here