रात्रीचं काम करत नाही, हे तुम्ही अजित पवार यांना सुनावताय का? तुम्ही अजितदादांचे विरोधक आहात का? दादांकडून एकदा चूक झाली असेल पण म्हणून तुम्ही त्यांना वारंवार बोलणार का? हे योग्य नाही. अजितदादा आमचे मित्र आहेत

मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली तेव्हा आठ वाजले होते, ती पहाटेची वेळ नव्हती. तुम्ही आठलाही पहाट म्हणता, हेच दुर्दैव असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
हायलाइट्स:
- अजित पवार यांच्याकडून त्या रात्री चूक झाली होती
- दादांकडून एकदा चूक झाली असेल पण म्हणून तुम्ही त्यांना वारंवार बोलणार का
सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी सभागृहात यासंदर्भात टिप्पणी केली होती. अजित पवार यांच्याकडून त्या रात्री चूक झाली होती. मात्र, त्यासाठी अजितदादांना (अजित पवार |) वारंवार बोल का लावता, असा खोचक प्रश्न मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारला होता.
सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?
केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्क्यांची अट शिथील केल्यास महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळेल. तेव्हा आम्ही मुस्लिमांनाही नोकरी आणि शिक्षणात ५ टक्के आरक्षण देऊ, असे नवाब मलिक यांनी म्हटले. त्याचा प्रतिवाद करताना सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की, एखाद्या समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार अल्पसंख्याक मंत्रालयाला नसतो. अल्पसंख्याक मंत्र्यांना आरक्षण देता आलं असतं तर त्यांनी रात्रीच फाईल काढली असती, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. त्यावर नवाब मलिक यांनी, ‘मी रात्रीची कामं करत नाही’, असे प्रत्युत्तर दिले. त्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत मुनगंटीवार यांनी अजित पवार यांना चिमटा काढला. रात्रीचं काम करत नाही, हे तुम्ही अजित पवार यांना सुनावताय का? तुम्ही अजितदादांचे विरोधक आहात का? दादांकडून एकदा चूक झाली असेल पण म्हणून तुम्ही त्यांना वारंवार बोलणार का? हे योग्य नाही. अजितदादा आमचे मित्र आहेत, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून