हिंगोली : प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे महागडा मोबाईल असावा. हल्लीच्या तरुणाईमध्ये तर मोबाईल घेण्याची मोठी क्रेझ आहे. मार्केटमध्येही अगदी लाखो रुपयांचे मोबाईल आहेत. असाच क्रेझ हिंगोलीच्या एक मुलाला होता. पण आपली कुवत नसल्यामुळे त्याने मोबाईल घेण्यासाठी असं काही केलं की, याचा आपण विचारही करू शकत नाही.

हिंगोलीमध्ये एका अल्पवयीन मुलाने मोबाईलसाठी चक्क बँक फोडण्याचा प्रयत्न केला आहे. मोबाईलवर गाणे ऐकण्यासाठी भारीचा मोबाईल हवा. यामुळे एका अल्पवयीन मुलाने चक्क हिंगोली शहरालगत बँक ऑफ इंडीया शाखा गंगानगर ही बँक फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस आणि नागरीकांच्या सतर्कतेने त्याचा प्रयत्न फसला. या प्रकरणी शनिवारी ता. २५ पहाटे त्याच्या विरुध्द हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा मोठा दणका; बडतर्फीच्या कारवाईवर दिला निर्णय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील टाकळी येथील एक अल्पवयीन मुलगा नांदेड जिल्ह्यातील शाळेत इयत्ता नववी वर्गात शिक्षण घेतो. मागील काही दिवसांपुर्वी तो गावाकडे आला होता. शाळेकडून त्याला शिष्यवृत्ती मिळत असल्याने त्यास बँकेत खाते काढण्यास सांगितले होते. त्यामुळे दोन महिन्यापुर्वी त्याची आई त्याला सोबत घेऊन हिंगोली शहरालगत गंगानगर येथील बँक ऑफ इंडीया या बँकेच्या शाखेत आली होती. यावेळी त्या मुलाने संपूर्ण बँक फिरून पाहिली. त्याला कॅशीयर जवळ खूप जास्त पैसे असल्याचे दिसून आले.

दरम्यान, घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्याने गाणे ऐकण्यासाठी भारीचा मोबाईल खरेदीसाठी चक्क बँक फोडून पैसे काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तो शुक्रवारी ता. २४ रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लोखंडी रॉड घेऊन बँकेच्या मागे लपला. त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन त्याने बँकेच्या पाठीमागील भितींला छिद्र पाडण्यास सुरवात केली. काही वेळानंतर बँकेच्या मागून आवाज येत असल्याने नागरीकांनी पाहणी केली तसेच रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या जमादार सुधीर तपासे यांनीही घटनास्थळी पाहणी केली. मात्र, त्याने अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला.

शिक्षक पतीची बेल्टने पत्नीला मारहाण, काही समजण्याआधीच सासऱ्याने केस पकडले आणि…
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधिक्षक विवेकानंद वाखारे, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आर. एन. मळघने, उपनिरीक्षक अच्युत मुपडे, जमादार रवी हरकाळ, आकाश पंडीतकर, गजानन पोकळे, सुधीर तपासे यांनी त्याचा शोध सुरु केला.

दरम्यान, तो मुलगा सावरखेडा गावाकडे पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे संपर्क साधला. त्या ठिकाणी रस्त्याच्या कामावर असलेल्या मजूरांनी त्यास पकडून ठेवले. त्यानंतर त्यास पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता गाणे ऐकण्यासाठी मोबाईल नसल्यामुळे हा प्रकार केल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणी त्या मुला विरुध्द हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

maharashtra rain forecast: नववर्षाआधी राज्यात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यांत विजाच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here