हायलाइट्स:

  • दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात
  • अपघातात एक महिला जागीच ठार
  • मृत महिला ही हिमाचल प्रदेश येथील असल्याची माहिती

अहमदनगर : श्रीगोंदे तालुक्यात दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून पाच जण जखमी झाले आहेत. नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावरील पारगाव फाटा शिवारात शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मृत महिला ही हिमाचल प्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली आहे. (अहमदनगर अपघात ताजी बातमी)

हिमाचल प्रदेश येथील पती-पत्नी आपल्या दोन मुलांसह गोवा येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यांची कार सकाळी आठच्या सुमारास पारगाव फाटानजीक आली असता, त्यांच्या गाडीची व बारामतीवरून नगरच्या दिशेने निघालेल्या चारचाकी वाहनाची समोरासमोर जोरात धडक झाली. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत.

अजितदादा म्हणाले एसटीचे विलीनीकरण विसरा, चंद्रकांत पाटील म्हणतात, इतका परखडपणा बरा नव्हे

जखमींना श्रीगोंदा व दौंड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

महागड्या मोबाईलसाठी तरुणाचा प्रताप, बँकेच्या मागच्या भिंतीला पाडलं छिद्र आणि…

दरम्यान, अपघात झाल्यानंतर घटनास्थळी धावून आलेल्या नागरिकांनी पोलीस आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. काही वेळाने रुग्णवाहिका आली आणि त्यानंतर जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं. घटनास्थळी शुभम वाडगे, किरण शिंदे, अक्षय जाधव, मयूर जाधव, गणेश पवार या तरुणांनी मदतकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here