मुंबई: महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा आता १२२वर गेला आहे. काल मुंबईत १० आणि सांगलीत एकाच कुटुंबातील ५ रुग्ण आढळल्याने हा आकडा १२२वर गेलाय. त्यात मुंबईत सर्वाधिक ५१ तर पुण्यातील १९ रुग्णांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये १२ आणि सांगलीत ९ रुग्ण आढळले आहेत. राज्याच्या ग्रामीण भागातही करोना रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान उभे राहिले आहे. लोकांनी गर्दी करू नये आणि एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, असे वारंवार आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. जाणून घेऊ या संदर्भातील ताज्या घडामोडी…
Live अपडेट्स…
>> राज्यात करोना रुग्णांसाठी २२ हजार खोल्यांची व्यवस्था
>> विश्रामगृहे आणि वसतिगृहांच्या खोल्यात होणार करोना रुग्णांवर उपचार
>> शासनाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पुण्यात साडे सतरा हजार मेसेज
>> करोनाच्या भीतीने राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात खासगी दवाखाने बंद; रुग्णांची ससेहोलपट
>> करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात टोलवसुली नाही
>> राज्यात अन्नधान्याचा तुटवडा नाही, दुकानांवर गर्दी करू नका; मुख्यमंत्र्यांचं आवाहन
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times