हायलाइट्स:
- कार आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात
- दोन जण जागीच ठार
- अपघातग्रस्त वाहनांचा चक्काचूर
सोलापूरहून भरधाव जाणाऱ्या कारची शहराकडे येणाऱ्या टेम्पोला समोरासमोर धडक झाली. या धडकेत कारमधील दोन जण जागीच ठार झाले आहेत, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व अपघातग्रस्त हे जत तालुक्यातील उमदी येथील आहेत. या गावातील सहा जण इस्तमासाठी औरंगाबाद येथे तीन दिवसांपूर्वी गेले होते. हा कार्यक्रम संपवून उमदी गावाकडे परतत असताना सकाळी हा अपघात झाला.
या अपघातामध्ये जैनुद्दीन काशीम यादगिरे (वय ४०, रा उमदी) आणि मौलाना साजिद खान (वय ४५, भिवंडी, मुंबई, सध्या रा. उमदी) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या अपघाताने उमदी गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.