नवी दिल्ली : करोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढतच चाललेला दिसतोय. रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याचं आकडेवारी दर्शवतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार, संपूर्ण देशात तीन आवड्यांसाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. यामुळे, कमी होण्याची शक्यता व्यक्त होतेय. परंतु, सद्य घडीला देशात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या ६०९ वर पोहचलीय. यामध्ये, ४३ परदेशी रुग्णांचा समावेश आहे. यातील ४० जणांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १० जणांना आपले जीव गमवावा लागला आहे.

सावध राहा, अफवा टाळा

केंद्र आणि राज्य सरकारकडून लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आपल्या घरातच राहा आणि सुरक्षित राहा असं जनतेला सांगण्यात येत आहे. करोना व्हायरसचा फैलाव होऊ नये, यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. तसंच अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाईही केली जातेय. परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठीही भारत सरकार सतत प्रयत्नशील आहे.

क्रमांक राज्य पॉजिटिव्ह (भारतीय) पॉझिटिव्ह (परदेशी) डिस्चार्ज मृत्यू
१. दिल्ली ३०
२. हरियाणा १४ १४ ११
३. केरळ १०१
४. राजस्थान ३४
५. तेलंगणा २५ १०
६. उत्तर प्रदेश ३६ ११
७. लडाख १३
८. तामिलनाडू १६
९. जम्मू-काश्मीर
१०. पंजाब २९
११. कर्नाटक ४१
१२. महाराष्ट्र १२५
१३. आंध्र प्रदेश
१४. उत्तराखंड
१५. ओडिशा
१६. प. बंगाल
१७. छत्तीसगड
१८. गुजरात ३७
१९. पुदुच्चेरी
२०. चंडीगड
२१. मध्य प्रदेश १४
२२. हिमाचल प्रदेश
२३. बिहार
२४. मणिपूर
२५. मिझोराम
२६. गोवा
५६६ ४३ ४३ १०

हेल्पलाईन क्रमांक

करोनाशी संबंधीत कोणतीही माहिती मिळवण्यासाठी +९१-११-२३९७८०४६ या क्रमांकावर फोन करा. याशिवाय राज्यांनीही आपले हेल्पलाईन क्रमांक जारी केलेले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here