मुंबई: छोट्या पडद्यावरून घराघरांत पोहोचलेली आणि सध्या रंगभूमीवरील अजरामर ‘फुलराणी’ ताकदीनं साकारणारी अभिनेत्री वी हेमांगी कवी धुमाळ आजकाल तिच्या सोशल मीडियापोस्टमुळं चर्चेत असते. हेमांगी सर्वच विषयावर ती रोखठोक मत मांडताना दिसते. तर तिच्या खासगी आयुष्याबद्दलही मोकळेपणानं लिहिते. नुकतीच तिनं शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
वाचून सुद्धा हायसं वाटलं गं…हेमांगीच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ पोस्टला इतर कलाकारांचाही पाठिंबा
हेमांगीनं ही पोस्ट केलीए तिच्या लग्नाच्या वाढदिवानिमित्त. शेअर केलेल्या पोस्टमध्ये हेमांगीनं तिच्या बद्दलच्या भावना शेअर केल्या आहेत. ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांनी तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काय लिहिलंय हेमांगीनं?
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! या वर्षांपासून आपल्या लग्नाला किती वर्षे झाली बोलून वर्ष मोजायची नाहीत तर प्रत्येक क्षण जगायचा! एकमेकांना सहन करत आलो वगैरे तर मुळीच म्हणणार नाही कारण आपल्याला माहितेय आपणकसे आहोत आणि काय आहोत एकमेकांसाठी आणि हे माहीत असणंच जास्त महत्वाचं आहे, असं हेमांगीनं लिहिलं आहे.


हेमांगी पुढे लिहिते की, आतापर्यंत आपल्या दोघांच्याही आयुष्यात मोहाचे क्षण आले असतील, पुढे ही येतील पण तरीही त्या उपर जाऊन आपण एकमेकांना निवडलंय आणि निवडू कुठल्याही आसक्ती शिवाय यातच आपल्या प्रेमाचं, संसाराचं यश आहे. एकमेकांना जिंकल्याचं प्रतीक आहे.एकमेकांशिवाय राहू शकत नाही ते आता… एकमेकांना सोडू शकत नाही दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! ☺️
भांडत राहू, वाईट परिस्थितीशी झगडत राहू, आनंदी राहू, समाधानी राहू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here