हायलाइट्स:

  • पाण्याच्या ड्रममध्ये आढळला होता बाळाचा मृतदेह
  • पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती
  • पोलीस तपासात धक्कादायक माहिती झाली उघड
  • बाळाच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या आईला केली अटक

ठाणे: ठाण्यातील कळवा परिसरात शनिवारी बेपत्ता झालेल्या पाच महिन्यांच्या बाळाचा मृतदेह एका पाण्याच्या ड्रममध्ये आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून काही संशयितांना ताब्यात घेतले होते. मात्र, पोलीस तपासात वेगळीच आणि धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

कळवा परिसरात सायबानगरमध्ये राहणारे पाच महिन्यांचे बाळ अचानक बेपत्ता झाले होते. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी या प्रकरणी धक्कादायक माहिती उघड झाली. बेपत्ता झालेले बाळ घरापासून काही अंतरावर एका गल्लीतील घरासमोरील पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये मृतावस्थेत आढळले होते. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या बाळाची तब्येत ठीक नव्हती. खोकला आणि उलट्या होत असल्याने त्याच्या आईने त्याला औषध दिले. परंतु, ते अधिक प्रमाणात दिल्याने बाळ मरण पावले, असा समज तिचा झाला. तिने बाळाला लपवून ठेवले. त्यानंतर सकाळी बाळाला पाण्याच्या ड्रममध्ये टाकले, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात बाळाच्या आईला अटक केली आहे.

दुर्दैवी! ५ महिन्यांच्या चिमुरड्याचा पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये आढळला मृतदेह
एटीएम कार्डचे क्लोनिंग; कोट्यवधींची फसवणूक

आदल्या दिवशी काय घडलं होतं नेमकं?

कळवा परिसरात सायबानगरमध्ये पाच महिन्यांचे बाळ शुक्रवारी अचानक बेपत्ता झाला होता. या प्रकरणात कळवा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. कळवा पोलिसांनी तात्काळ मुलाचा शोध सुरू केला. या गुन्ह्याचा तपास करत असताना, शनिवारी सकाळी या मुलाचा मृतदेह त्याच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या गल्लीतील एका घराबाहेरील पाण्याच्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये आढळून आला होता. नेमका मुलाचा मृत्यू कसा झाला?, ही हत्या आहे की आणखीन काही प्रकार? याविषयी कळवा पोलीस कसून चौकशी करत होते. या प्रकरणी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशीही केली जात होती.

धक्कादायक!अंबरनाथमध्ये पोलीस चौकीबाहेरच लष्करी जवानाला मारहाण; घटना कॅमेऱ्यात कैद
गॅसच्या भडक्यात कर्मचारी जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here