हायलाइट्स:
- मटण विक्रेत्याने ग्राहकांनाही केलं खूश
- चांदीची बिस्किटे वाटली
- उपक्रमाची तालुक्यात मोठी चर्चा
तनपुरे यांनी मटण-मासळीचा व्यवसाय सुरू केला असून अल्पावधीतच व्यावसायाचा विस्तार झाला. कर्जतमधून सुरुवात होऊन राज्यभरात त्यांच्या १७ शाखा सुरू आहेत. वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांनी ग्राहकांसाठी ही योजना आयोजित केली होती. चांदीच्या बिस्किटाचे प्रमुख बक्षीस संदीप नरहरी कोपनर यांना मिळालं. याशिवाय ११ चांदीची मोठी बिस्किटे आणि ५१ लहान चांदीची बिस्किटे वाटण्यात आली.
कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष सचिन घुले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील शेलार, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गणेश जेवरे, मच्छिंद्र अनारसे, सामाजिक संघटनेचे नितीन देशमुख, विनायक ढवळे, डॉ नितीन तनपुरे, शुभम तनपुरे, हर्शल तनपुरे, तुषार तनपुरे, शिवराज तनपुरे, सौरभ तनपुरे उपस्थित होते.
दरम्यान, याबद्दल उद्योजक शरद तनपुरे यांनी सांगितलं की, गेल्या वर्षभरात आमच्या राज्यभरात १७ शाखा सुरू झाल्या. या यशात ग्राहकांचाही वाटा आहे. त्यामुळे सोडत काढून त्यांना बक्षिसे वाटण्यात आली. आमच्या सर्व शाखांमध्ये देशसेवेतील लष्करी जवान आणि त्यांचे कुटुंबीय तसंच दिव्यांगांना १० टक्के सवलत देण्यात येते. पोलीस अधिकारी जाधव म्हणाले की, आपण अनेक ठिकाणी विविध व्यवसायिक पाहिले, मात्र अशा पद्धतीने एखाद्याने मटण विक्रेत्याने ग्राहकांना चांदीची बिस्किटे वाटणे प्रथमच पाहात आहे.