पुणे : आंध्र प्रदेशमधून पुण्याकडे जाणाऱ्या दोन ट्रकवर कारवाई करत ३० लाख रुपये किमतीचा तब्बल १६७ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील पाटसजवळ यवत पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत दोन ट्रक गांजासह ७८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून १२ जणांना अटक करण्यात आली आहे. (पुणे क्राईम बातम्या ताज्या)
आंध्रप्रदेश आणि कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात गांजा पुण्यात विक्रीसाठी नेला जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी रविवारी रात्री पाटसजवळील एका पेट्रोलपंपासह राजश्री हॉटेलच्या विरुद्ध बाजूला अशी दोन पथके तैनात केली. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दोन ट्रक संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना थांबवलं. त्यांची झडती घेतल्यानंतर चालकाच्या सीटच्या बाजूलाच सहा पिशव्यांमध्ये गांजा भरलेली पाकिटे आढळून आली. सुमारे ३० लाख १० हजार रुपये किमतीचा १६७ किलो गांजा आणि दोन ट्रक असा ७८ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. omicron latest update: ओमिक्रॉनबाबत मोठी बातमी! राज्यात आज ३१ नव्या रुग्णांचे निदान, मुंबईत सर्वाधिक रुग्ण
या प्रकरणी रवीकुमार जागेश्वरराव पुपल्ला, रवी कॉटया अजमेरा (दोघेही रा. क्रिष्णा, आंध्रप्रदेश), उमेश खंडू थोरात (रा. मंचर), युवराज किसन पवार (रा. मुथळा, जि. बुलढाणा), उत्तम काळू चव्हाण (रा. करवंड, बुलढाणा), प्रकाश एन व्यंकटेशराव (रा. विजयवाडा, आंध्रप्रदेश), किसन शालीमार पवार (रा. मुथळा, जि. बुलढाणा), रुक्मिणी रुपराव पवार मीना युवराज पवार, ललिता हिरालाल पवार (सर्व रा.ढाकरखेड, बुलढाणा), ममता उत्तम चव्हाण (रा. करवंड, बुलढाणा), लालाबाई देवीलाल चव्हाण (रा. चिखली, बुलढाणा) अशा ७ पुरुष आणि ५ महिलांना अटक केली आहे.
दरम्यान, पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करत आहेत.