औरंगाबाद : एकीकडे देशासह राज्याची ओमिक्रॉनमुळे चिंता वाढली असताना दुसरीकडे प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. औरंगाबादमध्ये ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आलेल्या तरुणाने माध्यमांना माहिती देत प्रशासनाची पोलखोल केली आहे. दुबईहुन आलेल्या या तरुणाची ना दिल्लीत, ना औरंगाबाददेत, दोन्ही ठिकाणी करोना चाचणी झाली नसल्याचा दावा या तरुणाने केला असल्याने खळबळ उडाली आहे.

शनिवारी दुबईहून औरंगाबादला आलेल्या एका तरुणाचा ओमिक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे हा तरुण दिल्ली विमानतळावर आल्यावर त्याची तेथे कोणतेही कोरोना चाचणी करण्यात आली नाही. त्यानंतर औरंगाबादमध्ये आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने सुद्धा कोणतेही चाचणी केली नाही.पण सर्दी झाल्याने तरुणाने स्वतःहून महानगरपालिका केंद्रावर जाऊन कोरोना चाचणी केली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खाजगी रुग्णालयात जाऊन भरती झाला.

ओमिक्रॉननंतर ‘या’ भयंकर आजाराने चिंता वाढवली, १० नवे रुग्ण समोर; रक्ताची गरज वाढणार
या तरुणाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर स्थानिक प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर त्याच्या स्वॅबचे नमूने पुण्यातील जिनोम सिक्वेन्सिंग लॅबकडे पाठवण्यात आले. ज्यात त्याचा ओमिक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. विशेष म्हणजे ज्या दिवशी या तरुणाचा ओमिक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्याच दिवशी त्याचा करोना रिपोर्ट निगिटिव्ह आला होता. पण तरीही त्याला उपचारासाठी रुग्णालयात ठेवण्यात आल्याचा आरोप तरुणाने केला आहे.

स्थानिक प्रशासनाची पोलखोल…

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद प्रशासन ‘औरंगाबाद पॅटर्न’च्या गप्पा मारत असताना, या तरुणाने स्थानिक प्रशासनाची पोलखोल केली आहे. विदेशातून आल्यानंतरदेखील त्याची करोना चाचणी करण्यात आली नाही. जेव्हा या तरुणाने प्रामाणिकपणे स्वतःहून कोरोना चाचणी केली तेव्हा तो ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. अन्यथा काय घडलं असतं याचा विचारही न केलेला बरा.

ST Strike News Today : एसटी कर्मचाऱ्यांनी गमावली संधी, दीड हजार एसटी कर्मचारी अद्याप संपावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here