त्यामुळे नगरमघील हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचा-यांची संख्या कमी होत आहे. आगामी काही दिवसांमध्ये आरोग्यसेवा देतांना समस्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या भिती आणि गैरसमजांचा फटका आरोग्यसेवा देणा-या हॉस्पिटल व दवाखान्यांना बसू लागला आहे. सरकारी व खाजगी दवाखान्यांमध्ये काम करणारे डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी शहरी भागात भाड्याने बंगले, फ्लॅट किंवा खोल्यांत राहतात. आजाराचे रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालय किंवा बुथ हॉस्पिटलमध्ये भरती केले जात आहेत. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एकाही खाजगी रुग्णालयात करोना बाधित रुग्ण भरती झाला नाही. तरीही हॉस्पिटलमध्ये काम करणारे संबंधित आरोग्य कर्मचारी करोना रुग्णाच्या संपर्कात आले असतील या शंकेतून अनेक ठिकाणचे घरमालकांकडून त्या आरोग्य सेवेत काम करणा-यांच्या कुटंबाला घर खाली करण्यास सांगत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
यासंबंधी एका मोठ्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले, ‘’आमच्या कुटुंबातील सदस्य तसेच नातेवाईकांकडून करोनापासून काळजी घेण्याचे सल्ले दिले जातात. मोठ्या मानसिक तणावाचे ओझे पाठीवर घेत आम्ही आरोग्यसेवेचे काम करत आहोत. अशा परिस्थितीत कुटुंबाच्या राहण्याचीच अडचण होत असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ऐनवेळी खोली मिळणे अवघड आहे. त्यातही हॉस्पिटलमध्ये काम करतो म्हटले, तर कोणी राहू देण्यास तयार होत नाही. या समस्यांना वैतागून अनेक ह़ॉस्पिटलमधील स्टाफ नोकरीवर पाणी सोडत आहे. शहरातील अनेक हॉस्पिटलमधील स्टाफ सुमारे निम्याने कमी झाल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे. वास्तविक पाहता हॉस्पिटलमध्ये काम करणा-या डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचा-यांनाही त्यांच्यासह कुटुंबाची काळजी असते. त्यामुळे ते स्वतः वैयक्तिकरित्या आरोग्याची काळजी घेतात.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times