नागपूर : ‘तिसरी लाट आलीच तरी ती मुलांवर आघात करण्याची शक्यता कमी आहे. शिवाय, इतरांसाठीही ती फार घातक ठरणार नाही. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण कमी राहील’, असा विश्वास क्रिम्स हॉस्पिटलचे प्रबंध संचालक व विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक अरबट यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतील क्रिम्समध्ये दाखल रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर त्या पाहणीचे निष्कर्ष मांडताना डॉ. अरबट म्हणाले की, ‘तिसरी लाट आलीच तर मधुमेह व इतर गंभीर आजार असणाऱ्यांनाच अधिक धोका होऊ शकतो. मुळात ओमायक्रॉनचा आजवर जो अभ्यास झाला, त्यानुसार तो अतिशय सौम्य स्वरूपाचा आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली तरी त्यामुळे फार नुकसान संभवत नाही. दुसऱ्या लाटेत मृत्यूची संख्या अधिक होती. असे असले तरी संसर्ग झालेल्या रुग्णांच्या तुलनेत प्रमाण काढले तर मृत्यूची टक्केवारी पहिल्या लाटेतच अधिक होती. पहिल्या लाटेत मृत्यूचे प्रमाण ८.२ टक्के होते, तर दुसऱ्या लाटेत हेच प्रमाण ६.८१ टक्के होते.’

ST Strike Update : एसटी संपामुळे सरकारही आक्रमक, कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई
कोव्हिडचे हे चक्र न संपणारे आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला बुस्टर डोस देण्याची गरज असल्याचेही डॉ. अरबट म्हणाले. त्यांच्यासहच डॉ. समीर अरबट, डॉ. परिमल देशपांडे, डॉ. स्वप्नील बक्कमवार, डॉ. गौरी गाडगे यांचा अभ्यास करणाऱ्या पथकात समावेश होता.

महापालिका निवडणुकांसाठी भाजपची तयारी, नव्याने २१ जणांना दिली संधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here