नागपूर : राज्यात एसटी कामगारांच्या मागण्या अद्यापही मान्य न झाल्यामुळे शासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आयुष्य संपवलं. पण तरीदेखील सरकार निर्णय घेत नसल्याने एसटीचा वाद आणखी वाढत चालल्याचं चित्र आहे. अजूनही कामावर रुजू न झालेल्या आणखी पाच कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासनातर्फे सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. यापूर्वी १६ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. (st bus strike news today Notice of suspension to 5 more ST employees in Nagpur)

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी दिवाळीपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्यामुळे अपवाद वगळता एसटीची चाके थांबली आहेत. या संपामुळे राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय घेतला. मात्र, ‘आम्हाला वेतनवाढ नको तर विलीनीकरणच हवे’, असे सांगत कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला. त्यानंतर कर्मचाऱ्यांचे निलंबन सुरू करण्यात आले. नागपूर विभागात आतापर्यंत ४३५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, तर रोजंदारीवरील ९० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. आंदोलकांचे संप काळातील वेतनही कापण्यात आले. मात्र, ‘तुम्ही कोणतीही कारवाई करा, आम्ही विलीकरणाच्या मागणीवर ठाम आहोत’, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

महापालिका निवडणुकांसाठी भाजपची तयारी, नव्याने २१ जणांना दिली संधी

कर्मचारी रूजू न झाल्यास परिवहनमंत्री अनिल परब यांनी कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, त्यांच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सुरुवातीला नागपूर विभागात १८ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. त्यांना या नोटीसला सात दिवसांत उत्तर द्यायचे होते. हा कालावधी संपल्यानंतर २४ डिसेंबर रोजी १६ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. आता पुन्हा पाच कर्मचाऱ्यांना अशीच नोटीस बजावण्यात आली आहे.

सोमवारी ५८ फेऱ्या

सोमवारी नागपूर विभागात १८ बसेसद्वारे ५८ फेऱ्या झाल्या. यात गणेशपेठेतून पाच, इमामवाड्यातून दोन, घाटरोडमधून तीन, उमरेडमधून तीन, सावनेर व वर्धमाननगरातून प्रत्येकी दोन व रामटेक आगारातू एक अशा बसेस सुटल्या. या बसेसनी ३ हजार १६४ किमीचा प्रवास केला. याद्वारे १ लाख ४५ हजार ६७१ रुपयांचे उत्पन्न झाले व २,५१७ प्रवाशांनी प्रवास केला. (st bus strike news today Notice of suspension to 5 more ST employees in Nagpur)

Aurangabad: माझ्या पत्नीला पाहून का हसतो म्हणताच, डोक्यात घातला….
(स्ट बस संपाची बातमी आज नागपुरातील आणखी 5 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here