अमरावती : राज्यात सांस्कृतिक व ऐतिहासिक शहर असलेल्या अमरावती जिल्हा सध्या या ना त्या कारणाने चर्चेत असतो. असतो येथील राज्य राखीव पोलीस दलातील एका सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने मरणापूर्वी आपल्या तेरवीचा कार्यक्रम ठेवल्याने सध्या याची चर्चा जिल्हाभरात जोरदार रंगली आहे. मरणापूर्वी तेरवीचा कार्यक्रम कसं शक्य आहे ? असा विचार तुमच्या मनात आला असेल पण हो हे खरं आहे. तेरवीचा कार्यक्रम ठेवला नाही तर या कार्यक्रमासाठी त्यांनी चक्क पत्रिका सुद्धा छापल्यात व आप्तस्वकीयांना सुद्धा वाटल्या.

राज्य राखीव पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दगडुजी डबरासे या वल्ली माणसांनी आपल्या मरणापूर्वी स्थापलेली तेरवीची पत्रिका आता जोरदार चर्चेत आहे. अमरावती येथील नवीन आयटीआय कॉलनी रहाटगाव रोड परिसरात सुखदेव डब्रसे राहतात त्यांचा एकुलता एक मुलगा मुंबई येथे बॉक्सिंगचा कोच आहे तर मुलगी पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू होणार आहे. प्रकृती ठणठणीत आहे. रोजचा व्यायामही सुरू आहे. पण आपल्या मरणानंतर होणारे आपले सत्कार सोहळे आपल्याला बघता येणार नाही.

ST Strike Update : एसटी संपामुळे सरकारही आक्रमक, कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई
याच भावनेतून त्यांनी गेट-टुगेदर म्हणून मरणापूर्वी तेरवीचा कार्यक्रम आखला. त्यांनी आपल्या मरणापूर्वी तेरवीचा कार्यक्रम पत्रिकेत लिहिले आहे की ‘आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे. कि मला सेवानिवृत्त होऊन पाच वर्षे सहा महिने होत असल्याने आणि मी सेवानिवृत्त होऊन पेन्शनचा आनंद घेत असल्यामुळे पुढील आयुष्य जगण्याची मनोइच्छा नसल्याने तसेच माझा मुलगा बाहेरगावी नोकरीला असल्याने माझे केव्हा मरण येईल याची शाश्वती नाही. हा कार्यक्रम स्वइच्छेने करीत आहे तरी या कार्यक्रमाला आपली इच्छाशक्ती दर्शवावी ही विनंती.
आपला प्रार्थी सुखदेव डबरासे असेही त्यांनी नमूद केला आहे.’

सेवानिवृत्त उपनिरीक्षक साहेबांची ही निमंत्रण पत्रिका सध्या जिल्ह्यात प्रचंड व्हायरल झाली असून चर्चेचा विषय ठरले आहे.

Christmas News : ख्रिसमससाठी माहेरी परतणाऱ्या महिलेवर काळाचा घाला, मुंबई येथून निघाली अन्…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here