एक कट्टर शिवसैनिक…
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावं, यासाठी बीडच्या एका शिवसैनिकाने तिरुपतीला नवस बोलला होता आणि नवस फेडण्यासाठी तब्बल ११०० किलोमीटर पायी जात असताना रस्त्यातच ते आजारी पडले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर, त्यांचं कुटुंब मात्र बेघर झालं आहे. “उद्धवसाहेब, माझ्या नवऱ्याने उभं आयुष्य शिवसेनेला दिलं, आता त्यांच्या माघारी आम्हाला मदत करा”, असं आर्जव मरेपर्यंत शिवसेनेची सेवा करणाऱ्या दिगंवत शिवसैनिकाच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे केलं होतं. त्यानंतर त्यांना तातडीने मदत करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हातात हात देताना दिसणाऱ्या या फोटोतले हे आहेत. कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर… आपल्या लाडक्या नेत्याला दीर्घायुष्य लाभावं म्हणून तिरुपतीला साकडे घालण्यासाठी तिरुपतीला पायी जात असताना पदयात्रेदरम्यान ते आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळले आहे. एक कट्टर शिवसैनिक म्हणून सुमंत यांची मातोश्रीपर्यंत ओळख होती.
सुमीत यांच्या जाण्याने कुटुंबीय धाय मोकलून रडत आहेत. घरातले कर्तेधर्ते सुमंत यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. सुमंत यांच्या पाश्चात वृद्ध वडील, पत्नी आणि दोन मुले आहेत. कुटुंब प्रमुखच निघून गेल्याने आता जगायचे कसे हा मोठा प्रश्न कुटुंबासमोर उभा राहिला होता. पण शिवसेना कुटुंबियांच्या मागे ठाम आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.