नवी दिल्लीः केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध उपाययोजनानंतरही करोना रुग्णांची संख्या वाढतेच आहे. गेल्या २४ तासांत करोनाचे देशात ४२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर चौघांचा मृत्यू झाला आहे. देशात करोनाच्या रुग्णांची संख्या ६४९पर्यंत पोहोचली आहे. यापैकी ६०६ रुग्ण भारतीय आहेत. तर ४७ विदेशी नागरिक आहेत. देशात करोनामुळे आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. तसंच माश्यांमुळे करोनाचा प्रादुर्भाव होत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अमितभा बच्चन यांनी माश्यांमुळे प्रादुर्भाव होतो, अशी भीती व्यक्त केली होती.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंताजनक

नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावं आणि घरातच राहावं, असं आवाहन सचिव अग्रवाल यांनी केलंय. एकजूट करोनाचा सामना करण्याची जबाबदारी सरकारसोबतच जनतेचीही आहे. गेल्या २४ तासांत करोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढलीय. करोनाचा हा वाढता प्रादुर्भाव चिंताजनक आहे. पण आपली वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचा विश्वास अग्रवाल यांनी व्यक्त केला. करोनाला हरवायचं असेल तर सर्वांनी मिळून नियमांचं पालन करणं हाच उपाय आहे, असं अग्रवाल यांनी म्हटलंय.

दुकानात खरेदी करताना आणि भाजीपाला बाजारात विशिष्ट अंतर ठेवून रांगेत उभे राहा आणि सुरक्षितपणे खरेदी करा. असे उपाय आपण सर्वांनी इतरबाबतीत राबवायला हवते. सध्या देशातील १७ राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशभरात आणखी २५ लॅब आणि खासगी लॅबना करोनासंबंधीचे नमुने तपासण्याची परवानगी देण्यात आली आहे. नमुने गोळा करण्यासाठी २० हजारांहून अधिक केंद्र स्थापन करण्यात आली आहे. दिल्लीतील एम्समधून डॉक्टरांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येत आहे. आशा कार्यकर्ता, एएनएम, आंगणवाडीसेविका करोनासंबंधी प्रशिक्षण देण्यात येत आहे. सध्या देशातील परिस्थिती नियंत्रणात आहे, असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलंय.

अमिताभ बच्चन यांचा दावा चुकीचा

माश्यांमुळे करोनाचा प्रादुर्भाव होतोय, असा दावा अमितभा बच्चन यांनी केला होता. पण करोना व्हायरसचा प्रादुर्भाव माश्यांद्वारे होत नाही, असं आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. करोनाची लागण झालेल्या रुग्णआच्या विष्टेत करोनाचे विषाणू असतात. हे विषाणू अनेक दिवस जिवंत राहू शकतात. यावर माशा बसल्या तर त्याद्वारे करोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यामुळे शौचालयांचा उपयोग करा, असं अमिताभ म्हणाले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here