हायलाइट्स:

  • वर्जिनियातील एका मूर्तीखाली आढळली टाईम कॅप्सूल
  • जनरल रॉबर्ट ई ली यांच्या मूर्तीखाली सापडला धातूचा संरक्षित डबा
  • टाईम कॅप्सूल म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या..

वॉशिंग्टन, अमेरिका :

अमेरिकेत एका मूर्तीखाली तांब्याच्या डब्यात बंद करून पुरण्यात आलेलं एक ‘टाईम कॅप्सूल’ आढळून आलंय. हे टाईम कॅप्सूल १३० वर्ष जुनं असल्याचं सांगण्यात येतंय.

एखाद्या बुटांच्या डब्याच्या आकाराच्या या ‘टाईम कॅप्सूल’मध्ये बटन, तत्कालीन चलन, नकाशे, अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांना त्यांच्या शवपेटीत ठेवलेल्या अवस्थेतील दुर्मिळ चित्र आणि काही गोळ्या ठेवण्यात आल्या आहेत.

महत्त्वाचं म्हणजे, याच स्थळावर आढळून आलेलं हे दुसरं टाईम कॅप्सूल आहे. या अगोदर आढळून आलेल्या ‘टाईम कॅप्सूल’मध्ये तीन पुस्तके, एक फोटो आणि एक नाणं आढळून आलं होतं.

वर्जिनियाचे गव्हर्नर राल्फ नार्थम यांनी ट्विट करून हे टाईम कॅप्सूल आढळल्याची घोषणा केली आहे. ‘कदाचित सर्व लोक ज्याचा शोध घेत आहेत तेच हे टाईम कॅप्सूल आहे’ असं ट्विट नार्थम यांनी केलंय.

Imran Khan: पाकिस्तानी लष्कर मोठा ‘गेम’ खेळणार; इम्रान खान यांची खुर्ची जाणार?
लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट : मास्टरमाईंड जसविंदर सिंहला जर्मनीत अटक
या टाईम कॅप्सूलमध्ये काय आहे? त्याचं पुढे काय करायचं? याचा अभ्यास संरक्षण कर्मचारी करत आहेत.

१८८७ च्या एका लेखानुसार, एक टाईम कॅप्सूल जनरल रॉबर्ट ई. ली यांच्या मूर्तीच्या खाली ठेवण्यात आलं होतं. जनरल रॉबर्ट यांनी यादवी युद्धादरम्यान उत्तर वर्जिनियाच्या सेनेचं नेतृत्व केलं होतं. जनरल रॉबर्ट यांची ही मूर्ती वर्जिनिया शहराच्या रिचमंड भागात स्थित आहे. १८६१-६५ दरम्यान चाललेल्या संघर्षात हाच भाग दक्षिमेची राजधानी म्हणून ओळखला जात होता.

गेल्या वर्षी जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर, वांशिक न्यायाची मागणी करणाऱ्या निदर्शकांकडून जनरल रॉबर्ट ई ली च्या पुतळ्यावर हल्ला करण्यात आला होता… त्यानंतर हा पुतळा पाडण्यात आला होता. याचं कारण म्हणजे, ली यांनी गुलामगिरी प्रथा कायम ठेवण्याचं समर्थन केलं होतं.

टाईम कॅप्सूल म्हणजे काय?

टाईम कॅप्सूल म्हणजे धातूचा एक असा डबा ज्यामध्ये वर्तमानकाळाची माहिती जपून ठेवली जाते. जमिनीखाली पुरल्यानंतर शेकडो वर्षांनी हा धातूचा डबा उघडला तरी तो काळ कसा होता, याचे अनेक पुरावे यात सापडू शकतात. जागेची किंवा संरचनेच्या काळाची माहिती देणारी कागदपत्रं, वस्तू, नाणी, शिक्के, पुस्तक, अहवाल, संरचनेचा आराखडा अशा वस्तूंचा यात समावेश असू शकतो.

तालिबान्यांवर टीका करताना जिनांबद्दल पाकिस्तानचे मंत्री म्हणतात…
हरिद्वार धर्मसंसद ‘हेट स्पीच’ प्रकरण : पाकिस्तानचा भारत सरकारवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here