हायलाइट्स:

  • केंद्रीय शिस्त तपासणी आयोगानं अधिकाऱ्यांना विचारला जाब
  • चीनमधील शियान प्रांतातील घटना
  • एकूण २६ अधिकाऱ्यांवर कारवाई

बीजिंग, चीन:

शहरात लॉकडाऊन असूनही करोना संसर्ग फैलावल्याच्या आरोपाखाली अनेक अधिकाऱ्यांना दंडित करण्यात आलंय. ही घटना चीनच्या शियान (Xi’an) या शहरात घडलीय. चीनच्या शिस्तपालन समितीकडून नुकतीच ही माहिती देण्यात आली. बीजिंगच्या कठोर ‘झिरो कोविड अप्रोच‘ अंतर्गत ही कारवाई करण्यात आलीय.

केंद्रीय शिस्त तपासणी आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पुरेशा कठोरतेनं नियमांची अंमलबजावणी न केल्या प्रकरणी एकूण २६ अधिकाऱ्यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

उल्लेखनीय म्हणजे, २०१९ मध्ये चीनमध्येच पहिल्यांदा करोना व्हायरस आढळून आला होता.

हरिद्वार धर्मसंसद ‘हेट स्पीच’ प्रकरण : पाकिस्तानचा भारत सरकारवर निशाणा
Imran Khan: पाकिस्तानी लष्कर मोठा ‘गेम’ खेळणार; इम्रान खान यांची खुर्ची जाणार?

चीनची राजधानी बीजिंगमध्ये फेब्रुवारीमध्ये ‘हिवाळी ऑलिम्पिक’चं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे कराना संसर्गाला ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आलंय.

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीननं कठोर सीमा निर्बंध, लांबलचक क्वारंटाईन नियम आणि ‘टार्गेटेड’ लॉकडाउन करोना रुग्णांची संख्या लक्षणीय पद्धतीनं कमी केली आहे.

चीननं करोना विषाणूबाबत कठोर धोरण स्वीकारले आहे. जे अधिकारी विषाणूचा उद्रेक रोखण्यात अयशस्वी ठरतात त्यांना नियमितपणे शिक्षा ठोठावली जात आहे. तसंच त्यांना वेगवेगळ्या कारवाईलाही सामोरं जावं लागत आहे.

करोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं पाहून ३० लाख लोकसंख्या असलेल्या शियानमध्ये लोकांना घरी राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रत्येक दोन दिवसांनी कुटुंबातील केवळ एका सदस्याला बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आलीय.

Time Capsule: अमेरिकेत आढळली १३० वर्ष जुनी ‘टाईम कॅप्सूल’… अनेक रहस्य समोर येणार?
तालिबान्यांवर टीका करताना जिनांबद्दल पाकिस्तानचे मंत्री म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here