कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नितेश राणे यांच्याशिवाय सामोरं जायची तयार ठेवा, अशा सूचना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. याच धामधुमीत जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्लामागे नितेश राणे (नितेश राणे) आणि गोट्या सावंत यांचा हात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ठाकरे सरकारकडून सर्व ताकद पणाला लावण्यात आली आहे. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असला तरी त्यांना जामीन मिळण्याबाबत शंका आहे.

या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी कणकवलीत बैठक घेत भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नितेश राणे यांना या प्रकरणात नाहक गोवले जात असल्याचे म्हटले. तरीदेखील कार्यकर्त्यांनी नितेश राणे यांच्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार राहावे. कोणत्याही परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजय मिळवायचाच आहे. त्यासाठी परिश्रम घ्या. पुढील दोन दिवस महत्त्वाचे असून सावध राहा, असे नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांच्यातर्फे वकिलांची फौज न्यायालयात उभी राहणार आहे. अ‍ॅडव्होकेट संग्राम देसाई नितेश राणे यांच्यासाठी युक्तिवाद करतील. तर अ‍ॅडव्होकेट राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर आणि उमेश सावंत हे वकील त्यांच्या सहकार्यासाठी उपलब्ध असतील. राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅडव्होकेट प्रदीप घरत आणि अ‍ॅडव्होकेट भूषण साळवी युक्तिवाद करतील.
कोण अजित पवार, कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्याचे दाखले मला काय देता; राणे संतापले
नितेश राणेंच्या अडचणी का वाढल्या?

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक प्रचारात १८ डिसेंबर रोजी कणकवलीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य संशयीत आरोपी सचिन सातपुतेला पोलिसांनी दिल्लीतून ताब्यात घेतले होते. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. त्याने २०१७ मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक भाजपकडून लढविली होती. तर संतोष परब यांनीही आपल्या जबाबात आपल्यावर नितेश राणे यांच्या सांगण्यावरुनच हल्ला झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
‘माझ्या स्थानाला कोणीही धक्का लावू शकत नाही, तसा प्रयत्न झालाच तर मला भाजपमध्ये बढती मिळेल’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here