हायलाइट्स:

  • तीन लहान मुलांचा बुडून मृत्यू
  • मखमालाबाद येथील घटना
  • कुटुंबीयांनी केला मोठा आक्रोश

नाशिक : पोहण्यासाठी डावा तट कालवा इथं गेलेल्या तीन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. प्रमोद बबन जाधव (१३), सिद्धेश अंबादास धोत्रे आणि निलेश काशिनाथ मुळे (१३, सर्व रा.अश्वमेध नगर) अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. (नाशिक न्यूज अपडेट्स)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मखमालाबाद येथील डावा तट कालवा येथे पाटाला पाणी सोडलेलं असल्यानं पोहण्यासाठी चार मित्र दुपारी एक वाजेच्या सुमारास गेले. मात्र दीड ते पावणे दोन वाजेच्या सुमारास पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील तिघे बुडू लागले. त्यांना बुडताना पाहून चौथ्या मित्राने घराच्या दिशेने पळत जात नातेवाईकांना माहिती दिली. तसंच तीन मुले बुडत असल्याची माहिती मिळताच पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

precaution dose : ६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी केंद्राची महत्त्वाची सूचना, प्रिकॉशन डोस घेण्यासाठी…

अग्निशमन दलाच्या जवानांनी मुलांना बाहेर काढत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान साडेतीन वाजेच्या सुमारास तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. यापैकी सिद्धेश सीडीओ मेरी हायस्कूल, निलेश रुंगठा हायस्कूल तर प्रमोद महापालिका शाळेतील विद्यार्थी आहे.

दरम्यान, तिन्ही मुलांची कौटुंबिक परिस्थिती सामान्य असून जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here