भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथील राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक सहा वर असलेल्या निंबार्ते हॉस्पिटल परिसरात ही घटना घडली आहे. मृतक विद्यार्थी हा आठव्या वर्गात शिकत असून इश्वर टिकेश्वर मेश्राम असे त्याचे नाव आहे.
वाचाः
जिल्ह्यात उसाची कापणी सुरू असून जिल्ह्यातून रोज शेकडो ट्रॅक्टर उस भरुन नागपूर जिल्ह्यातील साखर कारखान्यात नेले जात आहेत. अश्यातच लाखनीच्या महामार्गाने जात असलेला उसाच्या ट्रॅक्टरमध्ये असलेला उस पाहून गांधी विद्यालय येथे आठव्या वर्गात असलेला ईश्वर टिकेश्वर मेश्राम याला मोह आवरता आले नाही. त्याने ट्रॉलीमधून उस काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालत्या ट्रॅक्टरमधून उस काढत असता त्याचा तोल गेला व तो खाली पडून ट्रॉलीच्या चाकाखाली दबून त्याचा जागीच मृत्यू झाला.
वाचाः
सावरी मूरमाडी चा निवासी इश्वर मेश्राम च्या मृत्यु ची बातमी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. घटनास्थळी पोलीसांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. या घटनेनंतर गावत शोककळा पसरली आहे.
वाचाः