हायलाइट्स:

  • वॉरंन्ट रद्द करण्यासाठी लाच
  • पोलिसाला रंगेहात पकडले
  • पुणे शहरातील घटना

पुणे : न्यायालयाने काढलेले वॉरंन्ट रद्द करण्यासाठी दोन हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या घोडेगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक फौजदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. याप्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (पुणे क्राईम न्यूज)

कोंडाजी दामोदर रेंगडे (वय ५३) असं अटक केलेल्या पोलिसाचं नाव आहे. याबाबत ३४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

Nitesh Rane : नितेश राणेंना ‘बेल की जेल?’, उद्या फैसला, कोर्टात काय काय घडलं?

तक्रारदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याची सुनावणी घोडेगाव न्यायालयात सुरू आहे. या सुनावणीच्या वेळी तक्रारदार कोर्टात हजर राहत नव्हते. त्यामुळे न्यायालयाने तक्रारदार यांच्याविरुद्ध वॉरन्ट काढले होते. ते वॉरंन्ट रद्द करून घेण्यासाठी रेंगडे याने तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत त्यांनी एसीबीकडे तक्रार केली.

या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी लाच मागितल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार सापळा रचून तडजोडअंती दोन हजार रूपयांची लाच घेताना कोंडाजी रेंगडे या पोलिसाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक शितल घोगरे हे अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here